शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील बाजारपेठांना पुलांचा तडाखा!

By admin | Updated: October 17, 2016 00:54 IST

परिणामाबाबत उलटसुलट चर्चा : पाचवडमधील काम अंतिम टप्प्यात; गजबज असणाऱ्या ठिकाणी दिसतो शुकशुकाट

महेंद्र गायकवाड ल्ल पाचवड राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर असणाऱ्या व नेहमी वर्दळ असणाऱ्या लिंब, आनेवाडी व उडतारे याठिकाणी असलेल्या महामार्गालगतच्या बाजारपेठा उड्डाणपुलांमुळे पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. मुंबई व पुण्याहून ये-जा करणारे पर्यटक व वाहनचालक यांचे चहापाणी, जेवण व नाष्टा याकरिता हमखास थांबण्याचे ठिकाण म्हणून या बाजारपेठा प्रसिद्ध होत्या; परंतु या गावांच्या महामार्गावरील फाट्यांवर मोठे उड्डाणपूल झाल्याने येथील बाजारपेठांना त्याचा जबरदस्त तडाखा बसला आहे. नेहमी मोठी वर्दळ असणाऱ्या व कायम गजबजलेल्या या बाजारपेठांमध्ये आता मात्र चांगलाच शुकशुकाट पसरला आहे. वाई तालुक्यात अग्रेसर बाजारपेठ असलेल्या पाचवडमधील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. महामार्गाच्या दुतर्फा असणारी बाजारपेठ उड्डाणपुलांमुळे पूर्व-पश्चिम अशा दोन बाजूला विभागली जाणार आहे. महामार्गावरून प्रवास करणारे व खात्रीशीर व्यावसाय मिळवून देणारे प्रवासीच उड्डाणपुलामुळे याठिकाणी थांबणार नसल्याने येथील व्यावसायिकांची संपूर्ण भिस्त आता आजूबाजूच्या गावांमधून येणाऱ्या ग्राहकांवर राहणार आहे. लिंब, आनेवाडी व उडतारे ही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेली गावे आहेत. ही गावे महामार्गाला जोडली गेली असून, या सर्व गावांच्या फाट्यावर निर्माण झालेल्या बाजारपेठा नुकत्याच बाळसे धरू लागल्या होत्या. लिंब फाट्याला तर गेल्या दोन-चार वर्षांपासून मोठे महत्त्व निर्माण झाले होते. कॉलेजमुळे येथील माळरानावरील जमिनींना अव्वाच्या सव्वा दर आला होता. हॉटेल्स, किराणा दुकान, स्टेशनरी व इतर व्यावसायिकांना वर्षभरापूर्वी याठिकाणी अच्छे दिन आले होते. मात्र, महामार्गाच्या सहापदरीकरणात येथे उड्डाणपूल झाला आणि लिंब फाट्यावरील बाजारपेठेची नाळच जणू तोडली गेली. अशीच स्थिती आनेवाडी व उडतारे फाट्यांची झाली आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी या फाट्यांवर मोठ्या आशेने छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू केले होते. उड्डाणपूल निर्माण होण्याअगोदर महामार्गाच्या बाजूने असणारे उद्योग चांगले तेजीत चालले होते. येथील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतीचा बागायती माल महामार्गावरून ये-जा करणारे पुणे-मुंबईचे लोक हातोहात घेत होते. हॉटेल चालकांबरोबरच आॅटोमोबाईल व टायर-ट्यूबचे व्यवसायही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या गावांच्या फाट्यावरील उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आणि येथील बाजारपेठांना अवकळा आली. पुणे-मुंबई व कोल्हापूर-सांगलीकडून येणारे पर्यटक व वाहनचालक आता या बाजारपेठांमध्ये न थांबता उड्डाणपूलांवरून पुढचा रस्ता धरत आहेत. अशा परिस्थितीमुळे अस्मानाला भिडलेले येथील जमिनीचे भाव आता कोलमडले असून, याठिकाणचे व्यावसायिक व्यवसाय मंदावल्याने हवालदिल झाले आहेत. बाजारपेठांवर व्यावसायिकांच्या नजरा.. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांमुळे लिंब, आनेवाडी व उडतारे गावांच्या बाजारपेठांना तडाखा बसला असतानाच सध्या वाई तालुक्यातील पाचवड आणि भुर्इंज या महत्त्वाच्या बाजारपेठांमधील महामार्गावर उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. महामार्गावरील इतर बाजारपेठांना बसलेल्या तडाख्यामुळे पाचवडमधील प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अशा या दोन्ही बाजारपेठा उड्डाणपुलांनतर आपले अस्तित्व टिकविणार का? येथील व्यावसायिक व व्यापारी आपल्या व्यवसायांवर परिणाम होऊ नयेत, याकरिता कोणत्या उपाययोजना करणार? याबाबत या बाजारपेठांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. असे असलेतरी बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.