शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

कंटेनर उलटल्याने महामार्ग दोन तास ठप्प

By admin | Updated: May 18, 2015 00:57 IST

वाहतूक विस्कळीत : ताबा सुटल्याने दुर्घटना

मलकापूर : वनवासमाची, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत महामार्गावरच कंटेनर उलटल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. महामार्ग देखभाल विभाग व पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कंटेनर हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात कंटेनरचालक अरुण रघुनाथ यादव (वय ३५, रा. मनकरवाडी, ता. माण) हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावहून अ‍ॅल्युमिनीअम पावडर घेऊन कंटेनर (एमएच४३ वाय२०१) पुण्याच्या दिशेने निघाला होता. अरुण यादव हा कंटेनर चालवित होता. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वनवासमाची गावच्या हद्दीतील स्वराज इन्स्टिट्यूटसमोर कंटेनर आला असताना अचानक चालक अरुण यादवचा ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर दुभाजकावर जाऊन सातारा-कोल्हापूर लेनवर पलटी झाला. चालक यादव हा कंटेनरच्या केबिनमध्येच अडकला. अपघाताची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व महामार्ग देखभाल विभागाचे अमित पवार, गजानन सकट, रमेश खुणे, अमोल भिसे त्याठिकाणी आले. त्यांनी जखमी चालकास कंटेनरमधून बाहेर काढून रुग्णालयात हलविले. सकाळी साडेदहा वाजता कंटेनर महामार्गावरून हटविण्यात आला. (वार्ताहर)