कुडाळ : वारकरी संप्रदायाचे संस्कार जोपासणाऱ्या जावळी तालुक्याच्या सभापती जयश्री गिरी यांनी बेलावडे ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून स्वखर्चाने हायमास्ट दिव्यांची सोय करून दिली आहे. यामुळे बेलावडे गावातील भैरवनाथ मंदिराचा परिसर या दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाला आहे.
बेलावडे गावच्या ग्रामदैवत परिसरातील मुख्य चौकात रात्री मोठ्या प्रकाशाची गरज होती. याबाबत आरपीआयचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, राजे प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष नितीन शिंदे यांनी सभापती जयश्री गिरी यांच्याकडे मागणी केली होती. शासकीय निधीतून याचे नियोजन करता आले नाही. गावची गरज आणि ग्रामस्थांची मागणी याचा विचार करून माजी सभापती सुहास गिरी, सभापती जयश्री गिरी यांनी स्वखर्चातून हायमास्ट दिवे बसवून दिले.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या गिरी दाम्पत्याचा लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो. यासाठी स्वतःची पदरमोड करून सोयीसुविधा पुरविण्यात अग्रणी भूमिका असते. याचा प्रत्यक्ष प्रत्यय बेलावडे याठिकणी मिळाला आहे.
बेलावडे येथे बसवलेल्या हायमास्ट दिव्यांची पाहणी नुकतीच सभापती जयश्री गिरी यांनी केली. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, राजे प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष नितीन शिंदे, सरपंच वनिता रोकडे, सयाजी शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, बापूराव गायकवाड आदी उपस्थित होते.