शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

इथे महिलाच काठीने मारतात डुकरांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:34 IST

साताऱ्यात एकदा पाऊस सुरू झाला तर थांबायचे नावच घेत नाही. त्यातच परिसरात अस्वच्छता असल्यास रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो. सदरबझार परिसरात भटकी कुत्रे, डुकरांची संख्या प्रचंड वाढली आहे.

ठळक मुद्देनिरोगी कुटुंबासाठी उतरल्या रस्त्यावर : भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याची तयारी

जावेद खान ।सातारा : साताऱ्यात एकदा पाऊस सुरू झाला तर थांबायचे नावच घेत नाही. त्यातच परिसरात अस्वच्छता असल्यास रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो. सदरबझार परिसरात भटकी कुत्रे, डुकरांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबीयांचे आरोग्य जपण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. हातात काठी घेऊन त्या डुकरांना पिटाळताना दिसत आहेत.

सदरबझार येथील शिंपी गल्लीत डुकरं आणि कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पालिकेला सांगूनही उपाययोजना होत नसल्याने अखेर येथील महिलांनीच कुटुंब निरोगी राहण्यासाठी हातात काठ्या घेऊन डुकरांना पिटाळण्याचे काम सुरू केले आहे. पालिका प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सदर बझार येथील तीन ते चार नागरिकांना गेल्या वर्षी स्वाईन फ्लूने जीव गमवायला लागला होता. त्यामुळे या परिसरात डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये रोगराईची धास्ती निर्माण झाली आहे. याबाबत पालिकेला वारंवार सांगूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. सातारा पालिकेला कोणतेच गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. शिंपी गल्लीतील गल्ली बोळात डुकरांचा व कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे.सिक्युरिटी गार्ड नेमणार !पालिकेकडून आरोग्याविषयी कोणतीच उपाययोजना होत नसेल तर पालिकेची घरपट्टी न भरता या रकमेतून येथे डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड नेमण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. 

भांडी दिली फेकूनअंगणात भांडी घासताना भांड्यात डुकरे तोंड घालतात, त्यामुळे अनेकांनी भांडी फेकून दिली आहेत. तर काही जनावरे तर घरात घुसून भांड्यात तोंड घालतात. 

भटक्या जनावरांविषयी पालिकेला कळविले आहे. लवकरच संबंधित डुकरांच्या मालकांना नोटीस काढण्यात येणार आहे. तसेच सर्वत्र बंदिस्त गटार झाल्याने डुकरांना खायला मिळत नाहीत. नागरिकांनी घंटागाडीत खरकटे टाकल्यास हा त्रास कमी होईल.-विशाल जाधव, नगरसेवक, सातारा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका