पुसेगाव : परराज्यातून व्यवसायासाठी आलेल्या २५ गरजू कुटुंबांना पुसेगाव येथील ‘माय मराठी आणि जयहिंद फाऊंडेशन’ च्यावतीने मोफत अन्नधान्य व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जयहिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय संचालक सुभेदार मेजर हनुमंत चिकने, जयहिंद फाऊंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख मंदार शेटे, जिल्हा सचिव प्रा. उमेश मोरे, फाऊंडेशनच्या खटाव विभागप्रमुख प्रा. हेमलता फडतरे, अतुल गायकवाड, मकरंद देशमुख, किसन फडतरे, धैर्यशील किसन फडतरे, संदीप तोडकर, वेदांत आणि किशोर तोडकर, अर्चना घाडगे, माधुरी संदीप तोडकर, अनिशा बनकर, साक्षी कदम, संस्कृती दळवी, सीमा बाबर उपस्थित होते.