शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

कऱ्हाडला अतिवृष्टी; चौदा तास धुवाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST

कऱ्हाड : शहरासह तालुक्याला बुधवारी रात्रीपासून धुवाधार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर जोरदार पाऊस पडल्यामुळे ओढे तुंबून ...

कऱ्हाड : शहरासह तालुक्याला बुधवारी रात्रीपासून धुवाधार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर जोरदार पाऊस पडल्यामुळे ओढे तुंबून गुरुवारी सकाळी महामार्गावर पाणी साचले. परिणामी, गोटे गावानजीक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शहरात काही दुकानांमध्ये पाणी शिरले. तर उंब्रजमध्ये विलगीकरण कक्षात पाणी गेल्यामुळे रुग्ण अडकून पडले.

कऱ्हाडात काही दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. त्या वेळीही अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी, विक्रेत्यांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतानाच बुधवारी रात्री पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचा जोर कमी होता. मात्र, रात्री १० वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांसह दक्षिण मांड, वांग या उपनद्यांनाही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गोटे गावानजीक ओढ्याचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरले. चार ते पाच फूट पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हलकी वाहने रोखून धरली. तर अवजड वाहने या पाण्यातून वाट काढीत मार्गस्थ झाली. उत्तर मांड नदीकाठावरील शेतीसह घरे, वीटभट्टीमध्ये नदीचे पाणी शिरले. शिवडे येथे असलेल्या विलगीकरण कक्षाच्या आवारातही पाणी साठल्याने कक्षातील रुग्ण अडकून पडले.

तालुक्यात सध्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामेही हाती घेतली आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे या कामांचा खोळंबा झाला आहे. ठिकठिकाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे शेतात पाण्याचे तळे झाले असून, पेरणी केलेल्या क्षेत्रातील बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तर पाणी साचलेल्या शेतात पाण्याचा निचरा होईपर्यंत पेरणी करता येणार नसल्याचीही परिस्थिती आहे. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून पावसाचा जोर मंदावला. मात्र, सलग चौदा तास पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- चौकट (१७केआरडी०६)

महामार्गावरील पाण्यात कार बुडाली

इचलकरंजी येथून शिरवळकडे कारमधून निघालेले प्रदीप जाधव हे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोटे गावच्या हद्दीत पोहोचले. त्या वेळी महामार्गावर पाणी साचले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जाधव यांनी पाण्यातूनच कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही कार पाण्याबरोबर वाहत गेली आणि उपमार्गानजीकच्या खोल डोहात अडकली. या वेळी प्रदीप जाधव कारमधून बाहेर पडल्यामुळे सुदैवाने बचावले.

- चौकट

प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यात पाणी

शहरात मध्यवर्ती ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यात पाणी शिरले आहे. गुरुवारी सकाळी तळमजल्यातील पार्किंगमध्ये पाण्याचा डोह कर्मचाऱ्यांना पाहायला मिळाला. या पाण्यात काही वाहनेही अडकून पडली. कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून तळमजल्यातील पाण्याचा निचरा करीत वाहने बाहेर काढली.

- चौकट (फोटो : १७केआरडी०१)

घरांमध्येही पाण्याचे तळे

कऱ्हाडातील बनपूरकर कॉलनी मार्गावर पी. डी. पाटील उद्यानानजीक नाले तुंबल्यामुळे पावसाचे पाणी साचून काही घरांमध्ये शिरले. त्यामुळे संबंधित कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

- चौकट

तालुक्यात सरासरी ८८.०७ मिमी पाऊस

कऱ्हाड तालुक्यात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत चौदा तासांत सरासरी ८८.०७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूननंतर नोंदलेला हा सर्वाधिक पाऊस असून, या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

- चौकट

सुपने, कोपर्डे मंडलात सर्वाधिक

सुपने आणि कोपर्डे हवेली मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सुपनेत ९९ तर कोपर्डे मंडलात ९८ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसाने या दोन्ही विभागांतील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, काही घरांच्या भिंतींचीही पडझड झाली आहे.

- चौकट

विक्रमी नोंद

तालुक्यातील सर्व मंडल विभागांत एकूण ११४५.०० मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची चौदा तासांत नोंद झाली आहे.

- चौकट

चौदा तासांत मंडलनिहाय पाऊस

कऱ्हाड : ९५.००

मलकापूर : ९३.००

सैदापूर : ९०.००

कोपर्डे ह : ९८.००

मसूर : ७५.००

उंब्रज : ८५.००

शेणोली : ८८.००

कवठे : ८२.००

काले : ८०.००

कोळे : ८७.००

उंडाळे : ८५.००

सुपने : ९९.००

इंदोली : ८८.००

(सर्व आकडेवारी मिलिमीटरमध्ये)