शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

त्यांनी सही न केल्याने कर्जमाफी परत गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 23:56 IST

इंद्रजित मोहिते : टेंभू येथे आयोजित ‘कृष्णा’ संघर्ष दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

कऱ्हाड : पाच वर्षापूर्वी आमच्या संचालक मंडळाने शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेत कारखान्याच्या जलसिंचन योजनांचा समावेश केला. त्याद्वारे तब्बल ८ कोटी रुपयांची कर्जमाफीही मिळाली. परंतु विद्यमान अध्यक्षांनी संबंधीत कागदपत्रावर सही न केल्यामुळे मिळालेली कर्जमाफी परत गेली. याला सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. यासह अनेक बाबींमधून सभासदांचे अर्थिक नुकसान या मंडळींनी केले आहे. अशी टीका डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.टेंभू, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येवू घातलेल्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते अयोजीत संघर्ष दौऱ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय चरेगावकर होते. कारखान्याच्या माजी संचालिका वर्षाराणी पाटील, भास्कर पाटील, सयाजीराव पाटील, अधिकराव नलवडे, अशोक जाधव, राजाराम बाबर, शेरेचे दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कुंभार, संदिप भुसारी, युवराज भोईटे, नागराज शिंदे, मधुकर पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुहास महाडीक यांची उपस्थिती होती. डॉ. मोहिते म्हणाले, कारखान्याच्या टेंभू जलसिंचन योजनेची पाच वर्षापूर्वी अत्यंत भक्कम परिस्थिती होती. मागील पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे. गेल्या पाच वर्षात सभासदांना २५० ते २७५ रुपयांनी सरासरीपेक्षा ऊसदर कमी मिळाला आहे. विद्यमान अध्यक्ष कारखान्यात सगळेच विक्रमी आहे असे सांगतात. तर मग इतरांपेक्षा दर का कमी मिळत आहे. याचा खुलासा का करत नाहीत. पाच वर्षापूर्वी सहवीजनिर्मितीसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प कारखान्यात उभारल्यामुळे सध्या कामगारांचे पगार तरी देणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले. सुहास महाडीक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) सभासदांच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षसत्ताधाऱ्यांनी पाच वर्षात प्रत्येक गोष्ट ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे केली. त्यामुळे सभासदांच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी सभासदांच्या संसाराची थट्टा केली आहे. येत्या निवडणूकीत सभासद सत्ताधाऱ्यांचा प्रगतीऐवजी चाललेला ढोंगी कारभार उधळून लावतील व सभासदांची मालकी अबाधीत राखण्यासाठी यशवंतराव मोहितेंच्या विचाराला साथ देतील, असा विश्वास मोहीते यांनी व्यक्त केला.