शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

निंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:30 IST

निंबळक हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देनिंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकलाओळख पटविण्याचे काम सुरू : दोेरीने बांधून मृतदेह चादरीत बांधलेला

फलटण : निंबळक हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.याबाबत माहिती अशी की, निंबळक हद्दीतीळ एका विहिरीमध्ये बुधवार, दि. १ रोजी खून केलेल्या एका महिलेचा मृतदेह टाकला असल्याची माहिती पोलीस पाटलाला मिळाली. त्यानंतर पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका लाल रंगाच्या चादरीमध्ये मानवी मृतदेह दोरीने बांधलेल्या स्थितीमध्ये असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पोलीस पाटील कळस्कर यांनी याबाबतची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा केला. हा मृतदेह वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या महिलेचा असून त्या मृतदेहावर काळ्या रंगाची पॅन्ट व गुलाबी रंगाचे टी-शर्ट आहे. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशीमध्ये विचारपूस केली असता, तो मृतदेह कोणीच्याही ओळखीचा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोणीतरी त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह फलटण तालुक्यात आणून विहिरीत टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याबाबत सोलापूर, पुणे जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या महिलांबाबत माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी निंबळक गावचे पोलीस पाटील समाधान महादेव कळसकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर