शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

‘हर हर महादेव’ने दुमदुमली वाई!

By admin | Updated: January 15, 2015 23:28 IST

हजारो तरुणाई सहभागी : उत्स्फूर्त प्रतिसादात शिवप्रतिष्ठानच्या गटकोट मोहिमेस प्रारंभ

वाई : राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या युवकांच्या उपस्थितीत शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमेस वाई शहरातील द्रवीड हायस्कूलच्या मैदानावरुन गुरुवारी प्रारंभ झाला. या मोहिमेत सत्तर हजार तरुण सहभागी झाले असून ही मोहीम व्याजवाडी येथे पोहोचली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वाईनगरी दुमदुमून गेली. राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) व नगरविकास मंत्री डॉ़ रणजित पाटील यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे, प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, निमंत्रक विजयाताई भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ शेलार, ‘भाजप’चे प्रदेश सदस्य अविनाश फरांदे, वाईचे नगराध्यक्ष भुषण गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, सुतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक हुंबरे, प्रांतांधिकारी रवींद्र खेबुडकर, मुख्याधिकारी आशा राऊत, नगरसेवक अनिल सावंत, महेंंद्र धनवे, नंदकुमार खामकर, पोपटशेट ओसवाल उपस्थित होते़मंत्री डॉ़ पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत ठेवण्याच्या दृष्टीने तीस वर्षे गडकोट मोहीमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला पादाक्रांत करून किल्ल्याची डागडुजी व साफसफाई अव्याहतपणे करण्याचा वसा घेतलेल्या संभाजीराव भिडे गुरूजींचे कार्य अखंडपणे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.’ यावेळी इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर, बंडोपंत राज्योपाध्ये, पोपटलाल ओसवाल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भाषणे झाली.संदीप जायगुडे, संतोष काळे, सागर मालुसरे, दिनेश खैरे, सागर चौधरी, आप्पा मालूसरे, मुकुंद पोळ, भैया सकुंडे, अमित सोहनी आदींनी परिश्रम घेतले़ ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर-हर महादेव,’ च्या जयघोषाने वाईनगरीसह परिसर दूमदुमण गेला होता. (प्रतिनिधी)रांगोळ्यांनी स्वागत४गडकोट मोहीमेसाठी महाराष्ट्रासह बेळगांवमधून सुमारे साठ ते सत्तर हजार तरुण सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण वाई शहर शिवमय झाले होते़ जागो-जागी रांगोळया काढल्या होत्या. गडकोट मोहीमेची सुरूवात द्रविड हायस्कुलच्या मैदानावरून करण्यात आली. ती पुढे सिद्धनाथवाडी मार्गे-महागणपती पुलावरून-गंगापुरी शाहीर चौकातून - वाई नगरपालिका मार्गे-भाजी मंडई - दातार दवाखाना-रविवारपेठ चावडी चौक मार्गे-किसनवीर चौकातून कृष्णापूलावरून-सोनगिरवाडीतून बावधननाका मार्गे बावधन गावातून व्याजवाडी मुक्कामी गेली. किल्ल्यांच्या संर्वधनासाठी कटिबद्ध : पाटील‘गडकोट मोहीमेच्या माध्यमातून संभाजीराव भिडे गुरूजींच्या संस्कारातून देशभक्त तरूण पिढी निर्माण होत आहे. त्यांच्या विचाराचेच महाराष्ट्रातील सरकार आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे,’ असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. महाराष्ट्र एकसंधच हवा : संभाजीराव भिडे हा महाराष्ट्र एकसंध ठेवून देशात अग्रगण्य बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहीले पाहीजे. महाराष्ट्राचे तुकडे झालेले सहन केले जाणार नाहीत. यासाठी गडकोट मोहीमेच्या माध्यमातून निर्व्यसनी व सशक्त पिढी निर्माण करण्याचे कार्य आहोरात्रपणे चालू आहे. यासाठी शासनाचे सहकार्य अपेक्षित आहे़ - संभाजीराव भिडे