शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ...!गोरगरीब रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:11 IST

कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ असं उरातलं दु:ख घेऊन कष्टानं उभं राहणारे गोरगरीब लोक रस्त्यावर आले. आमची उपासमार थांबवा...अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला घातली.

ठळक मुद्दे हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ...!गोरगरीब रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयापुढे वाजला बँड-बाजा

सातारा : कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ असं उरातलं दु:ख घेऊन कष्टानं उभं राहणारे गोरगरीब लोक रस्त्यावर आले. आमची उपासमार थांबवा...अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला घातली.अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ रिक्षा युनियनच्यावतीने रिक्षा, चालक व मालक यांना कोरोना संकट काळात शासनाने तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कोरोना संकटकाळात शासनाने वेळोवेळी केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एका बाजूला उपासमारीशी सामना करत असताना दुसऱ्या बाजूला बँका, सोसायट्या, सहकारी बँका तसेच सर्व फायनान्स कंपन्या कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावत आहे. या व्यावसायिकांना कर्ज हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, तसेच कर्जाचे व्याज माफ करावे, परिवहन विभागातील कर माफ करावा, कोरोनामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर त्याचे सर्व कर्ज माफ करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, शहर अध्यक्ष शशिकांत खरात सहभागी झाले.बँड बेन्झो चालक व कलाकार संघटनेच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोकराव जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे, खटावचे उपसभापती आनंदराव भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड-बाजा आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २५0 ते ३00 बँड बेन्जो पथके कार्यरत आहे. प्रत्येक पथकात २0 ते २५ कलाकार काम करतात. प्रत्येक जिल्ह्यात ६ हजार ते ७ हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाने रोजीरोटीस महाग झालेल्या या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी करण्यात आली.यात्रेतील खेळणी, पाळणे व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ८00 कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. या कामगारांकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेच साधन नसल्याने खेळणी व पाळणे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासाठी बाळासाहेब सातपुते, सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.व्यावसायिकांची वरात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातकोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. विवाह सोहळे बंद झालेल्या बँडबाजा व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कलाकारांच्या हाताला आता काम राहिलेले नाही. या व्यवसायांनी बँड-बाजा वाजवतच आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. प्रशासनाने आमच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी