शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:14 IST

कऱ्हाड येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. काही ठिकाणी व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, तरीही ही मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देकऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई शेकडो टपऱ्या, दुकाने, हातगाड्यांसह अनधिकृत बांधकाम हटविले

कऱ्हाड : येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. काही ठिकाणी व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, तरीही ही मोहीम राबविण्यात आली.कऱ्हाड शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका हा रस्ता शहरातील वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आणि याच रस्त्यानजीक मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ विस्तारली आहे. अनेक व्यावसायिकांनी हद्दीबाहेर पदपथापर्यंत आपले व्यवसाय थाटले होते.

काही व्यावसायिकांनी पायऱ्यांचे बांधकाम केले होते. तर काहींनी पत्र्याची शेड थाटली होती. काही ठिकाणी पदपथाबाहेर टपऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. दुकानातील वस्तूच्या प्रतिकृती उभारून पदपथ हायजॅक करण्यात आले होते. काहींनी तर दुकानातील वस्तूंची शो साठी पदपथावरच मांडणी केली होती. तसेच फलकही उभारण्यात आले होते. या सर्व परिस्थितीमुळे पादचाऱ्यांना पदपथ सोडून रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या भेडसावत होती.मुख्य रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणाबाबत गत महिन्यात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी, त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले होते. त्यानंतर महिनाभर याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही.

अखेर बुधवारी सकाळीच पालिकेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दत्त चौकापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दत्त चौक, कर्मवीर चौक, बसस्थानक परिसर ते विजय दिवस चौकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये शेकडो अतिक्रमणे हटविण्यात आली.

जेसीबी, ट्रॅक्टरसह इतर वाहनांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी काही व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आणून देत ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. सकाळी साडेअकरापर्यंत या परिसरात अक्षरश: धावपळ उडाली. अतिक्रमण हटविल्यामुळे बसस्थानक परिसरासह मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. 

टॅग्स :KaradकराडMuncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर