शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हळदी-कुंकवाला जाणेही असुरक्षित!

By admin | Updated: September 22, 2015 00:13 IST

गंठण हिसकावले : शाहूपुुरीतील महालक्ष्मी कॉलनी रस्त्यावरील घटना

सातारा : गौरीपूजनानिमित्त घरोघरी आयोजित केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकवाला जाणेही महिलांसाठी सुरक्षित राहिले नसल्याचा अनुभव शाहूपुरीतील सुवासिनीला सोमवारी आला. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने या महिलेच्या साठ हजारांच्या गंठणावर हात मारला.ऋता सचिन देशमाने (वय २८, रा. पेंडसेनगर, लोकमंगल हायस्कूलच्या शेजारी, शाहूपुरी) यांनी या घटनेबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी गौरीपूजन असल्यामुळे घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. देशमाने या आपल्या सासूच्या घरी हळदी-कुंकवाला गेल्या होत्या. तेथून परतताना अज्ञात दुचाकीस्वार त्यांच्या मागून येऊन पुढे गेला. नंतर त्याने दुचाकी वळविली आणि देशमाने यांच्या समोर आला. क्षणार्धात त्याने देशमाने यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले आणि वेगात पोबारा केला. हे गंठण तीन तोळ्यांचे असून, त्याची किंमत सुमारे साठ हजार रुपये आहे. शाहूपुरीतील छाबडा हायस्कूलच्या मागील बाजूस ध्रुव गणेश मंदिर आहे. या मंदिराजवळ महालक्ष्मी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, उपनिरीक्षक पी. डी. देवकाते पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दोन साखळीचोरांना अटकवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गणेश भगवान गायकवाड (वय २०, रा. रामकुंड, सदर बझार), सईद बासू शेख (वय २५, रा. नगरपालिका चाळ, सदर बझार) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी मोटारसायकलवरून येऊन एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन वाट्या आणि मणी असलेले मंगळसूत्र हिसकावून नेले होते. हा प्रकार बढिये पेट्रोल पंप ते अजिंक्य बझार या रस्त्यावर घडला होता. या रस्त्यावर जबरी चोरीच्या घटना ज्यांच्या बाबतीत घडल्या असतील, त्यांनी स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.