शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus Satara- पळशीत वाड्या-वस्त्यांवर घरच्या घरीच केशकर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:49 IST

corona virus satara : माण तालुक्यातील पळशी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोना झपाट्याने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरातच राहून काळजी घेत आहेत. लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने आता ग्रामस्थांनी घरातील सदस्यांच्या मदतीने केश कर्तन घरच्या घरीच सुरू केले आहे.

ठळक मुद्देपळशीत वाड्या-वस्त्यांवर घरच्या घरीच केशकर्तनअसेल ते खाऊ.. पण नियम पाळू!

पळशी : माण तालुक्यातील पळशी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोना झपाट्याने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरातच राहून काळजी घेत आहेत. लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने आता ग्रामस्थांनी घरातील सदस्यांच्या मदतीने केश कर्तन घरच्या घरीच सुरू केले आहे.कोरोनाचा ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर शिरकाव झाला असून, माळीखोरा येथे सध्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती बाधित आढळल्याने त्यांना विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या आठवड्यात माळीखोरा येथे एकाच कुटुंबात तीन बाधित आढळले. पुन्हा त्याच कुटुंबात आणखी दोघे जण बाधित आढळल्याने ग्रामस्थांत अस्वस्थता पसरली आहे.

येथील लोकसंख्या जवळपास दीड ते दोन हजार इतकी आहे. येथील ग्रामस्थ आपली व कुटुंबीयांची काळजी घेत असून, घराबाहेरही येणे टाळत आहेत त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास एक प्रकारे मोलाची मदत होत आहे. स्वयंस्फूर्तीने परिसर आठ दिवसांपासून बंद करण्यात आला असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्वोपरी प्रयत्न करीत आहे.असेल ते खाऊ.. पण नियम पाळू!किराणा मालासाठी वस्त्यांवरील लोकांना गावात जावे लागत असले तरी सध्या गावात जाणे सर्वांनीच टाळले असल्याचे दिसत आहे. असेल ते खाऊ.. पण, नियम पाळू! असा निश्चय सर्वांनीच केल्याचे दिसत आहे.वेळ निभावून जात आहे...लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंदची परिस्थिती असून केश कर्तनाची दुकाने बंद आहेत. त्यामुळे यूट्युबवर पाहून अनेक जण वेडेवाकडे का होईना पण घराच्या घरीच घरातील सदस्यांच्या मदतीने मुलांचे केश कर्तन करीत आहेत. अर्थात कारागिरांची सर येत नसली तरी वेळ निभावून जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर