शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

जखिणवाडीच्या मल्लाला हवीय मदतीचा हात!

By admin | Updated: August 28, 2016 00:05 IST

जॉर्जीयाला कुस्ती स्पर्धेसाठी निवड : परिस्थितीमुळे पालक हतबल

कऱ्हाड : तालुक्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आॅलिम्पिक स्पर्धेमधून भारताला कुस्ती प्रकारातील पहिले पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची ही कर्मभूमी आहे. त्यानंतर पै. मारुती वडार, महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील आदींनीही ही परंपरा पुढे सुरू ठेवली. त्यामुळे या मातीतील अनेक मल्ल कुस्तीच्या फडात बाजी मारताना दिसतात. बालेवाडी येथे असोसिएशनने घेतलेल्या स्पर्धेमध्ये जखिणवाडीच्या हृतिक झिमरेने ८५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले. त्याची जॉर्जीया येथे होणाऱ्या वर्ल्ड पँके्रशन चॅम्पियनशिपसाठी निवड झालीय खरी; पण त्याच्या व पालकांसमोर प्रश्न उभा आहे तो यासाठी येणाऱ्या खर्चाचा, त्याला समाजातील दानशूरांनी मदतीचा हात दिला तर तो जॉर्जीयामध्ये कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याशिवाय राहणार नाही. कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी हे एक छोटेसे गाव. या गावातील हृतिक भीमराव झिमरे हा विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिकतो. त्याचे आजोबा हिराबा झिमरे व चुलते दिनकर झिमरे हे दोघेही पैलवान. घरातल्या या ज्येष्ठांचा हा कुस्तीचा वारसा तो पुढे चालवत आहे. गावातल्या तालमीत सराव करत करत लहान-मोठ्या कुस्त्यांच्या फडात त्याने आजपावेतो अनेक बक्षिसे जिंकली आहेत. शालेय कुस्ती स्पर्धेतही तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने ८५ किलो वजनी गटात पहिलाच क्रमांक मिळविला आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही त्यावर मात करीत कुस्तीसारख्या क्रीडा प्रकारात त्याची चाललेली दमदार वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. बालेवाडी पुणे येथे पाचवी नॅशनल ट्रॅडीशनल रेसलिंग अ‍ॅन्ड पँक्रेशन चॅम्पियनशिप स्पर्धा काही दिवसांपूर्वीच झाली. त्यात या जखिणवाडीच्या विद्यार्थी मल्लाने सुवर्ण पदक मिळविले. त्याची निवड जॉर्जीया येथे होणाऱ्या वर्ल्ड पँके्रशन चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. तेथे जाऊन ही कुस्ती स्पर्धा जिंकण्याची त्याची मनिष आहे; पण वडील भीमराव झिमरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला स्पर्धेला पाठविण्यासाठी लागणारी सुमारे एक लाख तीस हजारांची रक्कम कशी जमा करायची या विवेंचनेने हतबल झाले आहेत. त्याला जर समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला. तर कऱ्हाड तालुक्यातला आणखीन एक चांगला मल्ल तयार करण्यासाठी हातभार लागेल, यात शंका नाही. जखिणवाडीने ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान आदी स्पर्धातील एकवीस पारितोषिके प्राप्त केली आहेत. हृतिक झिमरे सारख्या मुलांच्या यशामुळे गावच्या लौकिकात भर पडणार आहे. (प्रतिनिधी)