शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

सातारा भोंदूबाबाच्या घरी सीसीटीव्ही पोलिसांकडून हैदर अलीच्या फ्लॅटची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:26 IST

सातारा : आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

ठळक मुद्देगुरुवार पेठेतील हलविलेल्या वस्तूंचा शोध सुरूकाही वर्षांपूर्वी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी असं वागू नको, अशी समजूतही घातली होती. मात्र,

सातारा : आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला हैदरअली शेख (वय ४६, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्या साताºयातील फ्लॅटमध्ये पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी झाडाझडती घेतली. या भोंदूबाबाच्या कार्यालय आणि घरावर सीसीटीव्हीचा खडा पहारा पाहून पोलिसही आवाक झाले.

सातारा स्थित असलेल्या या भोंदूबाबाने पुण्यामध्ये भानगडी केल्यानंतर त्याचे एक-एक किस्से आता समोर येऊ लागले आहेत. अमावस्या, पोर्णिमेला म्हणे या भोंदूबाबाचा दरबार भरत होता. लाल बहादूर शास्त्री कॉलेजच्या पाठीमागील एका इमारतीमध्ये या बाबाचे दोन फ्लॅट आहेत. दुसºया मजल्यावरील फ्लॅटमध्ये तो दरबार भरवित असत. तर तळ मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये तो कुटुंबासह राहत आहे. संपूर्ण इमारतीमध्ये कोणाच्याही फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही नाहीत.

मात्र, या भोंदूबाबाच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर दोन सीसीटीव्ही लावलेले आहेत. येणा-जाणाºया प्रत्येकावर भोंदूबाबाचा वॉच असायचा. भूत उतरवून देतो, आजार बरा करतो, असे सांगून तो दरबार भरवत होता. साताºयामधील लोकही आता त्याचे किस्से सांगू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी या भोंदूबाबावर वाई पोलिस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल झाला असल्याचे समोर येत आहे. तसेच २००६ ला सातारा पालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्येही तो निवडणुकीला उभा राहिला होता. त्यावेळी त्याचे डिपॉझिटही जप्त झाले होते. काही वर्षांपूर्वी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी असं वागू नको, अशी समजूतही घातली होती. मात्र, त्याच्या उचापतीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचे अनेकजण सांगतायत.अन् त्याला रडू कोसळलंया भोंदूबाबाला पुणे पोलिसांनी तपासासाठी बुधवारी साताºयात आणलं होतं. त्याच्या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी त्याला रडू कोसळलं. कदाचित आपण केलेल्या कृत्याचे त्याला पश्चात्ताप झाला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. सुमारे चार तासांनंतर त्याला परत पुण्याला नेण्यात आले.दान केलेल्या गाड्या पार्किंगमध्येपीडित महिलेच्या पतीने दिलेल्या अलिशान गाड्या अद्याप पोलिसांनी भोंदूबाबाकडून जप्त केल्या नाहीत. या सर्व गाड्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहेत. पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर साताºयातील त्याच्या हस्तकांच्या हालचाली वाढल्या. दरबार भरत असलेल्या खोलीतील इतर साहित्य रातोरात एका रिक्षाने अन्य ठिकाणी हलविण्यात आल्याची कुणकुण लागताच त्याचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिसांकडून आवाहनसंबंधित भोंदूबाबाने पुण्यात जादूटोणाचे प्रकार करून एका कुटुंबाला फसविल्याचे समोर आल्यानंतर साताºयामध्ये त्याने असे प्रकार केले असावेत काय, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. भोंदूबाबाकडून गैरकृत्य झाले असेल तर संबंधितांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.