शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

मयूरेशच्या नावाने गुणवंत खेळाडू पुरस्कार

By admin | Updated: February 8, 2015 00:53 IST

तावडे यांची घोषणा : कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्याची ग्वाही

मायणी : नेटबॉल खेळाडू मयूरेशचे निधन हा राज्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणारा गुणवंत खेळाडू पुरस्कार यापुढे मयूरेशच्या नावाने दिला जाईल. त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.मायणी येथील नेटबॉल खेळाडू मयूरेश पवार याचे केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान निधन झाले होते. मयूरेशच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री तावडे शनिवारी मायणीत आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मायणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे, वडूज बाजार समितीचे सभापती सोमनाथ माळी, सुधाकर कुबेर, सरपंच प्रकाश कणसे उपस्थित होते.मायणी येथील भारत माता विद्यालयात आयोजित शोकसभेत तावडे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयात शिकणारा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू बनतो, ही बाब कौतुकास्पद आहे. मयूरेशने १९ व्या वर्षापर्यंत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली होती. मयूरेशचा लहान भाऊ आकाशच्या यापुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी राज्य शासन घेईल.’ ‘लोकमत’च्या वृत्तानंतर गणेशचीही भेटमयूरेशच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याचा मित्र व राष्ट्रीय खेळाडू गणेश भारत चौधरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. यासंदर्भात वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री विनोद तावडे यांनी मायणी येथील रुग्णालयात जाऊन गणेशला धीर दिला. त्यास आंतरराष्ट्रीय खेळासाठी शासनातर्फे मदत केली जाईल, असे सांगितले. त्याच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे देण्याची ग्वाही त्याच्या आई-वडिलांना तावडे यांनी दिली.