शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुंड दत्तात्रय पवार जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:10 IST

गर्दी, मारामारी, विनयभंग, घरात प्रवेश करून मारहाण करणे आदी पाच गुन्हे दाखल असलेला गुंड दत्तात्रय उत्तम पवार (वय ४२,रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगुंड दत्तात्रय पवार जिल्ह्यातून तडीपारआणखी काही व्यक्तींना तडीपार करण्यात येणार

वाठार स्टेशन : गर्दी, मारामारी, विनयभंग, घरात प्रवेश करून मारहाण करणे आदी पाच गुन्हे दाखल असलेला गुंड दत्तात्रय उत्तम पवार (वय ४२,रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.दत्तात्रय पवार याच्याविरूद्ध असलेल्या पाच गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्याच्या वर्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने हद्दपारीचा प्रस्ताव कोरेगाव येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दत्तात्रय पवार याला तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मुलाणी यांनी त्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे सोडून दिले.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी काही व्यक्तींना तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर, सहायक पोलीस फौजदार जाधव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSatara areaसातारा परिसर