शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतले ६५ गावांचे पालकत्त्व

By admin | Updated: November 24, 2014 23:14 IST

स्वच्छ भारत मोहीम : कामकाजाचा घेतला आढावा

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ६६५ गावांचे पालकत्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, त्यानुसार या सर्व अधिकाऱ्यांनी गावभेटी देऊन गावच्या कामकाजाबाबत आढावा घेतला तसेच गावातील शाळांमधून ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रमही राबविला. त्यामुळे याा अभियानात आता प्रशासन दक्ष झाले असून गाव पातळीवर जागृतीची खरी गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वच्छतेबाबत व शौचालये नसलेल्या कुटुंबांची यादी प्रत्येकास देण्यात आली होती. त्यानुसार प्रजासत्ताक दिनापर्यंत प्रत्येक कुटुंबांचे शौचालय पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बहुआयामी व सुधारित कार्यक्रम अंगिकारण्यात आला आहे. खंडाळ्याचे सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनी पंचायत समिती स्तरावर केलेल्य नियोजनानुसार महसूल, कृषी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी गावातील शौचालये नसलेल्या कुटुंबांना भेटी दिल्या. प्रत्येक कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.खंडाळा तालुक्यातील ६५ पैकी पाच गावे पूर्ण शौचालय असलेले आहेत. त्यामुळे उर्वरत ६० गावांमधील प्रत्येक ९ कुटुंबे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन कामकाजास सुरुवात केली आहे. त्यामुळे आागामी दोन महिन्यांत पाचशे कुटुंब शौचालयधारक होणार आहेत. योजनेसाठी गरजू कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासकीय अनुदानही देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानात तालुक्यात परिवर्तनीय काम होण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)खंडाळा तालुक्यात यापूर्वी ग्रामस्वच्छता अभियानातही भरीव कामगिरी झाली होती. स्वच्छ भारत अभियानातही सामाजिक दायित्व पत्करून सर्व गावांमध्ये काम करण्याचा मानस आहे. रमेश धायगुडे-पाटीलसभापती, पंचायत समिती, खंडाळा