शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अधिकाऱ्यांकडे दोनशे गावांचे पालकत्व

By admin | Updated: November 19, 2014 23:26 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ : कऱ्हाड तालुक्यातील वीस हजार ५६७ कुटुंबांना शौचालये बांधणीसाठी प्रवृत्त करणार

कऱ्हाड : ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राममध्ये लोकसहभागाद्वारे आघाडीवर आलेल्या कऱ्हाड तालुक्यात आता ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गंत शौचालये नसणाऱ्या कुटुंबांचे पालक अधिकारी म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८ गावांतील शौचालये नसणाऱ्या वीस हजार ५६७ कुटुंबांना नियुक्त केलेले तीन हजार नव्वद पालक अधिकारी उद्या (गुरुवार) गृहभेटीद्वारे शौचालये बांधणीस प्रवृत्त करणार आहेत.कऱ्हाड तालुक्यात शासनाच्या ग्राम स्वच्छता अभियान, निर्मलग्राम योजनांसह विविध योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यश आले आहे. लोकाभिमुख योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरत असलेल्या कऱ्हाड पंचायत समितीच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गंत विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन स्वच्छतेच महत्त्व पटविण्याचे काम सुरू केले आहे. ‘स्वच्छतेचे नायक आम्ही, स्वच्छतेचे पाईक आम्ही, चला करू स्वच्छ गाव,’ हे घोष वाक्य वास्तवात उतरवत तालुक्यातील १९८ गावांत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक, तलाठी, वायरमन, अंगणवाडी कर्मचारी यासह सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी हे ‘स्वच्छ भारत’ अभियान लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गंत पालक अधिकारी त्यांच्याकडे असलेल्या कुटुंबांना दि. २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष भेट देऊन शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत. त्याचबरोबर दि. २६ जानेवारीपर्यंत शौचालये बांधून पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका व जिल्हास्तरावरून आपला साप्ताहिक आढावा व अहवाल घेण्यात येणार आहे. या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शौचालये बांधल्यानंतर सर्व्हेत नाव असलेल्या कुटुंबास ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत बारा हजार रुपये तर सर्व्हेत नाव नसणाऱ्या कुटुंबांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून दहा हजार पाचशे रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. (प्रतिनिधी)चला, करू स्वच्छ गाव...कऱ्हाड तालुक्यात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शौचालय नसणाऱ्या कुटुंबांमध्ये जनजागृती करून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यासाठी सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समितीच्या वतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. शौचालये उभारण्यासाठी लोकचळवळ उभारून ‘चला, करू स्वच्छ गाव,’ हा नारा प्रत्येक गावागावात आणि वाडी-वस्तींवर पोहोचविण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी योगदान देत असल्याची माहिती सभापती देवराज पाटील व उपसभापती विठ्ठलराव जाधव यांनी दिली.तीन हजार नव्वद पालक अधिकारीकऱ्हाड तालुक्यातील ८८ हजार ५६४ कुटुंबांपैकी ६७ हजार ९९७ एवढ्या कुटुंबांकडे शौचालय आहे. उर्वरित शौचालये नसलेल्या वीस हजार ५६७ कुटुंबांना शौचालय बांधण्याची गरज पटवून देऊन, ते बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी अशी तीन हजार नव्वद पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली. गावनिहाय पालक अधिकारीजखिणवाडी : प्रांताधिकारी किशोर पवारवारुंजी : पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टेमुंढे : तहसीलदार सुधाकर भोसलेपाल : सभापती देवराज पाटीलसैदापूर : उपसभापती विठ्ठलराव जाधवगोटे : गटविकास अधिकारी अविनाश फडतरेचचेगाव : पोलीस निरीक्षक नितीन जगतापउंब्रज : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप मानेकार्वे : अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. कोरे