शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांची आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळख; साताऱ्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव 

By नितीन काळेल | Updated: September 24, 2024 18:58 IST

सातारा : ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नावाने ओळख होती. मात्र, आता दोन्ही पदे रद्द करुन ...

सातारा : ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नावाने ओळख होती. मात्र, आता दोन्ही पदे रद्द करुन यापुढे केवळ ग्रामपंचायत अधिकारी या पदनामाने नवी ओळख या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामसेवक संघटनेनेनेही याचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.ग्रामपंचायतीला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकच होती. मात्र, लहान ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक तर मोठी ग्रामपंचायत संभाळणाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी असे पदनाम असायचे. परंतु दोन्ही पदे एकच असल्याने तसेच वेतन व भत्तेही सारखेच असल्याने ही पदे संभ्रम निर्माण करणारी आहेत. त्यामुळे एकाच नावाने ही ओळख कायम करावी व ग्रामसेवक संवर्गाची वेतन त्रुटी दूर होण्यासाठी राज्य ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही दोन्ही पदे रद्द करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम कायम करण्यात आले आहे. यामुळे ग्रामसेवक संवर्गाची वेतन त्रुटी दूर झाली आहे.शासनाच्या या निर्णयाचा ग्रामसेवक संघटनेने सातारा जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत चव्हाण, सरचिटणीस संदीप सावंत, उपाध्यक्ष विजयराव निंबाळकर, रमेश साळुंखे, गोविंद माने, अशोक मिंड, शरद गायकवाड, मोहन कोळी, मधुकर पाटील संजय यादव, हिम्मत गायकवाड, राहुल कदम, संजय पालवे, विजय भिलारे, अजित जाधव, प्रवीण जाधव, बागल, वायदंडे, जयश्री नलावडे, आदी उपस्थित होते

ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, सरचिटणीस सूचित घरत आणि राज्य कार्यकारिणीच्या पाठपुराव्याने ग्रामसेवक संवर्गाची प्रलंबित असलेली वेतन त्रुटी दूर झाली आहे. याबद्दल सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेकडून राज्य शासन तसेच राज्य संघटनेचे मनःपूर्वक आभारी आहोत. - अभिजित चव्हाण, जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत