सातारा : जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाने शुक्रवारी जाहीर केलेला आहे.
प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम असा आहे - तहसीलदारांनी गुगलमॅपच्या साहाय्याने १५ फेब्रुवारीपर्यंत नकाशे अंतिम करायचे आहेत. तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्त पाहणी करून १८ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण निश्चित करणे, २३ फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभागरचनेला मान्यता द्यायची आहे. २ मार्च रोजी विशेष ग्रामसभेची सूचना द्यायची आहे. ५ मार्च रोजी विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडत काढायची आहे. १५ मार्चपर्यंत प्रभागरचनेवर हरकती मागविणे, २४ मार्च रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर याची सुनावणी घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला १ एप्रिल रोजी प्रसिध्दी दिली जाणार आहे.