शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoroanVirus Satara : ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी सरसावले ग्रामपंचायत सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 11:41 IST

CoroanVirus Satara : कोरोनासारख्या विषाणूशी लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आपल्या गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागावर अवलंबून न राहता खंडाळा तालुक्यातील म्हावशी ग्रामपंचायतीने स्वतःचे इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सिमीटर खरेदी करून स्वतः ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी तपासणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या आरोग्यासाठी सरसावले ग्रामपंचायत सदस्य म्हावशी गावात अनोखा उपक्रम : आरोग्यविषयक आदर्श काम

खंडाळा : कोरोनासारख्या विषाणूशी लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आपल्या गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागावर अवलंबून न राहता खंडाळा तालुक्यातील म्हावशी ग्रामपंचायतीने स्वतःचे इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सिमीटर खरेदी करून स्वतः ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी तपासणी सुरू केली आहे.जिल्ह्यात उल्लेखनीय काम असलेल्या या गावातील ग्रामपंचायत सदस्यच लोकांच्या आरोग्यासाठी मैदानात उतरून उचललेले पाऊल निश्चितच आदर्शवत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचे नवीन आदेश दिले असल्याने खंडाळा तालुक्यातील बहुतांशी व्यवहार बंद आहेत.

म्हावशी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरपंच कृष्णात भुजबळ, उपसरपंच विनोद राऊत, सदस्य बापूसाहेब राऊत, सुषमा माळी, प्रज्ञा जावळे, जयश्री पवार, विजया राऊत, ग्रामसेवक मल्हारी शेळके, आरोग्य सेविका छाया होले, आशा सेविका शोभा राऊत, अंगणवाडी सेविका अलका राऊत, सारिका पिसाळ यांनी संयुक्त बैठक घेऊन गावची विशेष काळजी घेण्याचे निश्चित केले.

विशेषतः ग्रामीण भागात गावातून सर्वत्र भीतीयुक्त शांतता दिसून येते. अशा परिस्थितीत गावातील लोकांची आरोग्यविषयक देखभाल घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सिमीटर खरेदी करून त्याद्वारे थर्मल तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. दररोज ग्रामपंचायतीचे सदस्य व अंगणवाडी सेविका ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

गरज भासल्यास आवश्यक औषधोपचार करण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे कोरोनाच्या काळात गाव पातळीवर घेतली जाणारी काळजी इतर गावांना दिशा देणारा उपक्रम ठरत आहे. तसेच हे काम पाहणारे कर्मचारी यांना सॅनिटायझर, हँडग्लोज व मास्क ग्रामपंचायतीने उपलब्ध करून तालुक्यात आदर्शवत काम करून इतर गावांना दिशा दाखविण्याचे काम केले आहे.

कोरोनाची भीती वाडी-वस्तीवर पसरली आहे. छोट्या गावातील लोक काळजीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी गावातच त्यांच्या तापमानाची तपासणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार गावातच तपासणी सुरू झाल्याने प्राथमिक अवस्थेतील रुग्ण लक्षात येणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार होण्यास प्रतिबंध होईल, याचे ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.-कृष्णात भुजबळ,सरपंच, म्हावशी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर