शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Result: साताऱ्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल, भाजप, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या दोन्ही गटांकडे कल

By दीपक शिंदे | Updated: December 20, 2022 12:31 IST

Gram Panchayat Election Result: सातारा जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु असून साडे आकरापर्यंतच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला आहे.

-दीपक शिंदे सातारा - जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु असून साडे आकरापर्यंतच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठ्या ग्रामपंचायतीत धोबीपछाड दिली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांना अनेक ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. तर मंगळवारी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप आणि राष्ट्रवादीलाच सर्वाधिक ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचीही अनेक ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. माण तालुक्यात शेखर गोरे यांच्यामुळे ठाकरे गटाला काही ग्रामपंचायतीत शिरकाव करता आला. माणमधीलच कुरणेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप गटाकडे गेली आहे. तर महाबळेश्वरवाडीत आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अनिल देसाईंकडे राहिली आहे. माणमधील बहुतांशी ग्रामपंचायती भाजपकडे राहण्याचा कल आहे. 

कऱ्हाड तालुक्यातील आटके ग्रामपंचायतीत ३५ वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. सरपंचपदी महािवाकस आघाडीचा विजय झाला. वडगाव हवेलीत सत्तांतर होऊन भाजपला विजय मिळाला. तर येथे काॅंग्रेसला धक्का बसला आहे. फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायत महत्वाची असते. याठिकाणी भाजपचा सरपंच झाला आहे. तर बहुचर्चीत गिरवीत सह्याद्री कदम यांच्या गटाची सत्ता राहिली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली आणि देगाव ग्रामपंचायत येते. ही दोन्हीही गावे मोठी असल्यने निकालाकडे लक्ष होते. या ठिकाणी आमदार महेश शिंदे गटाची सत्ता आली आहे. यामुळे आमदार शशिकांत शिंदे गटाला मानहानीकारक पराभवाला सामारे जावे लागले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSatara areaसातारा परिसर