शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:26 IST

Ramraje Naik-Nimbalkar, sataranews गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. हे स्पष्ट होताच शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

ठळक मुद्देशासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही फलटण तालुक्यातील कापूर उत्पादकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

फलटण : गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. हे स्पष्ट होताच शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.फलटण, बारामती, माळशिरस येथे चाळीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होत असे, त्यातून येथे सहकारी व खासगी जिनिंग फॅक्टरी उभ्या राहिल्या. कोट्यवधी व्यापार, शेकडो हातांना काम, शेतकरी समाधानी अशी स्थिती होती. मात्र कापसावर आलेल्या बोंड आळी व अन्य रोगाने या भागातील कापूस पीक नामशेष झाल्याने शेती व व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

फलटण बारामती भागात कापूस उत्पादन सुरू आहे; पण विक्री नाही. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून बारामती, फलटण तालुक्यांत कापसाचे क्षेत्र वाढत असताना त्याच्या विक्रीची व्यवस्था नसल्याने त्याची कवडी मोलाने विक्री सुरू झाली आहे. पार्श्वभूमीवर ही बाब काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी ते बोलत होते.राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अथवा महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे माध्यमातून येथे शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कापूस विक्रीची गडबड करू नका, शासकीय हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची ग्वाही रामराजे यांनी कापूस उत्पादकांना दिली आहे.

गोखळी, साठे, सरडे, गुणवरे, ढवळेवाडी परिसरात यावर्षी सुमारे तीनशे एकर क्षेत्रावर कापूस लागण झाली आहे. रास्त दर मिळाला नाही तर हे पांढरे सोने पुन्हा नामशेष होणार शासकीय हमीभाव प्रति क्विंटल ५८०० रुपये असताना सध्या केवळ चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री करावा लागत आहे.यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खटकेवस्तीचे सरपंच बापुराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी गावडे, विद्यमान संचालक संतोष खटके, गोखळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज गावडे, नवनाथ गावडे, योगेश गावडे, राजेंद्र भागवत, योगेश जाधव उपस्थित होते.

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरSatara areaसातारा परिसर