शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

By नितीन काळेल | Updated: December 14, 2023 16:49 IST

मागण्या मान्य होईपर्यंत संपाचा निर्धार 

सातारा : जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला.शासकीय, निमशासकीय कार्यालये, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका, नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी विविध संघटनांच्या समन्वय समितीने जिल्ह्यात बेमुदत संप सुरू केला आहे. यामध्ये सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यासाठी साताऱ्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर जिल्हा परिषद कर्मचारीही चालत न्यायालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. याठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. जवळपास एक तासभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालले. यामध्ये शेकडोच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होत. तर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनादरम्यान, विविध संघटांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती करण्यात आली. निवेदन दिल्यानंतर कर्मचारी आंदोलनस्थळावरुन संपावर गेले.

पंचायत समितीतील कर्मचारीही संपात..जिल्हास्तरावरील कार्यालयातील कर्मचारी मागण्यांसाठी संपात सहभागी झाले आहेत. तसेच तालुकास्तरावरील कार्यालयातही याचा परिणाम दिसून आला आहे. पंचायत समितीतील कर्मचारीही संपात आहेत. त्यामुळे तेथील कामावरही परिणाम झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारStrikeसंप