शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकिय कर्मचाऱ्यांचा मोर्चा, कार्यालयांत सन्नाटा 

By दीपक देशमुख | Updated: March 14, 2023 13:04 IST

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शासकिय कर्मचारी बेमुदत संपावर

सातारा : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो शासकिय कर्मचारी आज, मंगळवार (दि.१४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान, सातारा शहरातील सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आला.सातारा जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, पालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अंशकालीन कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी आज, मंगळवार (दि. १४) पासून बेमुदत मोर्चावर गेले आहेत. सकाळी  १०.३० वाजता सातारा परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेला. याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शासकीय कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच जे कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत त्यांनाही सहभागी करण्याचे आवाहन नेत्यांनी केले. प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने प्रयत्न झाले. परंतु, या रास्त मागण्यांना आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या. सरकारने जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी अभ्यास समिती नेमली असली तरी यापूर्वीही समिती नेमली आहे. त्यामुळे ठोस निर्णय होईपर्यंत संप सुरूच राहील. उद्यादेखील याच पद्धतीने सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या नेत्यांनी केले.यानंतर आंदोलकांनी प्रतिकात्मक निदर्शने केली. यावेळी जुनी पेन्शन सुरू झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळील रस्ता आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला होता.दरम्यान, जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या आदी  मागण्या निवेदनात केल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन