शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पिकांनी टाकली मान; शेतकरी हतबल !

By admin | Updated: August 19, 2015 21:29 IST

खंडाळा तालुका : पावसाची ओढ संपेना, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर दशरथ ननावरे - खंडाळा

हजारो रुपयांचं मातीआड झालेलं बियाणं, डोक्यावर पांढरफटकं आभाळं, कुठं-कुठं उगवलेली पिकंही कोमजली जाऊ लागलीत. पावसानं दिलेली ओढ. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला असून, आता पुढचे दिवस कसे जाणार? हीच चिंता लागून राहिलेला शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्रन्दिवस कुटुंब, जनावरं कशी जगवावीत हाच घोर जिवाला लागल्याने खंडाळा तालुक्यातील शेतकरी कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरव्ही जून महिन्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे जूनअखेरपर्यंत बहुतांशी पिकांची पेरणी पूर्ण होते. यावर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचे बियाणे मातीआड केले; परंतु वरुणराजाने पुरती पाठ फिरवल्याने अद्यापही पावसाचा मागमूस नाही. तालुक्यातील अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचा वर्षभराचे आर्थिक नियोजन खरीप हंगामावर अवलंबून असते. मात्र पावसाअभावी हे सर्वच नियोजन कोलमडून पडले आहे. तालुक्याचा बागायती भागात बाजरी पीक कसेबसे तग धरून आहे. मात्र, इतर पिके जगण्याची शाश्वती कमी आहे. पश्चिम भागातील भातपिकाचे क्षेत्र लागवड झालेल्यापैकी ६० टक्के क्षेत्र कोमेजून गेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी १८,३८४ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असते. यावर्षी १४,६१९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. भात, बाजरी, मका, घेवडा, वाटाणा, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन इतर गळित व कडधान्ये या पिकांचा समावेश असतो. या संपूर्ण क्षेत्रासाठी लाखो रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. मशागतीसाठीही लाखांवर खर्च केला आहे. खंडाळा तालुक्यातील खरीप हंगामासाठी पिकावर उपलब्ध क्षेत्र व त्यापैकी लागवड झालेले क्षेत्र खालीलप्रमाणे : पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) भात ११७६ ५५४ घेवडा ४८३ ४२६ बाजरी १२६०३ १००४४ वाटाणा २८७ १४१ मका ५७९ ४५६ तूर २२ २२ तृणधान्ये १२९ ११ उडीद १८१ १५४ भुईमूग १२२५ १०७१ मूग ३३० २८८ सोयाबीन १०६९ ११४० इतर कडधान्ये २०१ २४० इतर गळीत ९९ ७२ खंडाळा तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. भात पिकांची अवस्था नुकसानकारक असून, जवळपास ६० टक्के भात लागवड वाया जाण्याच्या स्थितीत आहे. बागायती भागात बाजरी पिके अजूनतरी व्यवस्थित असली तरी इतर पिकांची स्थिती गंभीर आहे. पाऊस पडला नाही तर मोठे नुकसान संभवते. - शिवाजी मांगले, कृषी अधिकारी, खंडाळा पावसाअभावी आमची पिके धोक्यात आहेत. यावर्षी उत्पन्न मिळेल असे वाटत नाही. जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या मोठी आहे. माणसं कशीबी जगवू; पण जनावरांच्या पोटाचं काय? असा घोर लागला आहे. शासनाने चाऱ्याचा प्रश्नावर मार्ग काढावा. - लक्ष्मणराव धायगुडे, शेतकरी