शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं

By admin | Updated: December 13, 2015 01:16 IST

म्हसवडमध्ये रथोत्सव : गुलाल-खोबऱ्याची उधळण करत गावातून मिरवणूकऽऽ’चा गजर!

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरीचा रथोत्सव पार पडला. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती. यात्रेच्या मुख्यदिवशी शनिवारी पहाटे श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा करुन काकड आरती करण्यात आली. देवाच्या मूर्तीस अभिषेक करुन पंचधातूच्या श्रींच्या मूर्ती सालकरी व देवाचे मुख्य पुजारी राजेंद्र बुरंगे यांच्या घरी नेण्यात आल्या. दुपारी दोनच्या सुमारास मूर्ती पालखीत ठेवून वाजत-गाजत रथापर्यंत नेण्यात आली. तेथे मूर्ती रथात स्थानापन्न करण्यात आल्या. यावेळी भाविकांनी ‘सिद्धनाथाच्या नावाचा जयघोष केला. भोजराज देवाच्या सासनकाठ्या व कऱ्हाड येथील मानाच्या काठ्यांची भेट झाली. भाविकांनी श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर रथोत्सवा प्रारंभ झाला. गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथावर निशाने लावून सजविण्यात आला. कऱ्हाड, कालगाव, ढेबेवाडी, जांभूळणी, शिराळा येथील मानाच्या काठ्यांच्या भेटीचा कार्यक्रम माणनदीच्या पात्रात पार पडला. त्यानंतर माळी, सुतार, लोहार समाजाच्या मानकऱ्यांनी रथ ओढण्यास सुुरुवात केली. रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी गुलाल, खोबऱ्याची उधळण केली केली जात होती. त्यामुळे रस्ते गुलालमय झाले होते. रथ सायंकाळी वडजाई ओढ्याजवळ आला असता रिवाजाप्रमाणे वडजाई देवीला साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला आहे. रथ ओढण्याचा मान माळी समाज व बारा बलुतेदारांना आहे. रथाचे स्वारथ्थ अजितराव राजेमाने, आबासाहेब राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, तेजसिंह राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने विराजमान झाले होते. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. सातारा-पंढरपूर मार्गावरील मायणी चौक ते पोळ पंपच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती. यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केल्यामुळे यंदा म्हसवडमध्ये विक्रमी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनालाही कसरत करावी लागली. (प्रतिनिधी)