शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

‘शुभमंगल’वर महागाईचे ‘अशुभ’ सावट

By admin | Updated: April 15, 2015 23:58 IST

दरवाढीचा निर्णय : मंगल कार्यालय व्यवसाय होणार अधिक खर्चिक

सातारा : वाढता वाढता वाढे, अशी अवस्था महागाईची झाल्यामुळे आता सर्वच ठिकाणी त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याला अपवाद मंगलकार्य व्यावसायिकही नाहीत. गेल्या काही दिवसांत बाजारात असलेली आर्थिक तेजीचा फटका या व्यावसायिकांनीही बसला आहे. त्यामुळे या हंगामात त्यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. त्यानुसार प्रत्येकाने दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सातारा शुभमंगल कार्य व्यावसायिक विकास संस्था यांची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, तसेच मंगल कार्यालयाचे मालक, आचारी व मंडप व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी सभासदांनी व्यावसायिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या समस्या, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, तसेच दरवाढ आदी विषयांवर चर्चा करून सध्याच्या महागाईच्या काळात ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने विविध उपाय सुचविले व सध्या अस्तित्वात असणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मंगल कार्य व्यावसायिकांनाही अनिवार्यपणे दरवाढ करावी लागत आहे. गेल्या तीन वर्षांत कोणतीही दरवाढ झाली नसल्यामुळे यावेळी त्यांनी सरसकट दहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.दरवाढीच्या विषयावर सर्व सभासदांनी एकमत झाल्यावर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. तसेच दरवाढीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी दर पत्रकाप्रमाणे दर घ्यावेत व अंमलबजावणी करावी, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. संस्थेच्या सर्व सभासदांनी तसेच व्यावसायिकांनी संस्थेने काढलेले नवीन वाढीव दर पत्रक घेऊन जावे, असे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी)अशी झाली दरवाढखुर्ची ५१०ताट (शेकडा)१५०२००आचारी७००१५००सहायक१००३५०व्यावसायिक सिलिंडर६००१२००मंडप ५७(प्रति स्क्वे. फू.) मदतनिसांचा तुटवडा..मंगल कार्य व्यावसायिकांना सध्या कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. पूर्वी शंभर रुपये हजेरी या दराने येणारे युवक आता तीनशे रुपये आकारू लागले आहेत. जेवण वाढणे एवढ्या एका कामासाठी एका मुलाला तीनशे द्यावे लागतात. अशी किमान दहा मुले घ्यावी लागतात. अलीकडे मात्र तीनशे रुपये देऊनही मुलं मिळत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या नात्यातील लोकांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून बाजारातील परिस्थिती आणि वस्तूंचे दर लक्षात घेता शुभमंगल कार्य व्यावसायिकांना जेमतेम उत्पन्न मिळत आहे. लग्नसराईत जर उत्पन्न नाही मिळाले तर पुढे वर्षभर या व्यावसायिकांना हालाखीत काढावे लागते. त्यामुळे या दरवाढीला ग्राहकांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा.- उदय गुजर, अध्यक्ष शुभमंगल लग्न कार्यात निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिकचा खर्च होतो. त्यात आता मंगल कार्यालय व्यावसायिकांनी केलेली दरवाढ त्रासाची ठरणार आहे. आता या वाढीव खर्चासाठीही लग्नाच्या बजेटमध्ये तरतूद करावी लागणार हे स्पष्ट आहे.- सयाजी कदम, सातारा