शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चोरून आणलेली फुलं देवाला नको; साताऱ्यात बोर्डची चर्चा 

By प्रगती पाटील | Updated: December 31, 2023 18:30 IST

नववर्षाचा संकल्प बोर्डाद्वारे व्यक्त.

 सातारा : भल्या सकाळी व्यायामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या सातारकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील काही जण चक्क फळाफुलांची चोरी करतात. यावर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेला बोर्ड सध्या चर्चेत आहे. 'चोरून आणलेली फुले देवाला वाहणार नाही. झाडे लावणाऱ्यांसाठी ती ठेवूया,' असा मजकूर लिहिलेला बोर्ड समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी फिरण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या हातात आणि खिशात प्लास्टिकच्या पिशव्या असतात. व्यायाम करून झाला की परतीच्या मार्गाने जाताना या पिशव्या खिशातून बाहेर निघतात. लोकांच्या दारात लावलेल्या झाडांच्या फुलांवर मग डल्ला मारला जातो. रोज सकाळी न चुकता घरच्या देवांसाठी म्हणून ही फुलं तोडली जातात. याविषयी कोणी हटकले तर असू दे की देवासाठी तर नेतोय असे उत्तर दिले जाते. विशेष म्हणजे फुलं तोडण्यापासून कोणाला हटकले तर भल्या सकाळी भांड नाही होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते काहीजण तर कंपाऊंडच्या बाहेर झाड आहे म्हणून फुल तोडली असे समर्थनही करतात. 

 १. स्वकष्टाने अशी करा भक्तीगेल्या काही वर्षात साताऱ्यात अपार्टमेंट संस्कृती रुजली आहे. त्यामुळे लोकांना झाडे लावण्यासाठी अंगण किंवा पुरेशी जागा उपलब्ध नसते ही वस्तुस्थिती असली तरी, दोन कुंड्यांमध्ये फुल झाडे लावून त्याची फुलं देवाला अर्पण करणे सहज शक्य आहे. तितकी जागा प्रत्येकाकडेच असते. स्वकष्टाने भक्ती करण्याचा हा मार्ग नववर्षाच्या निमित्ताने सातारकरांनी अवलंब व्हावा अशी अपेक्षा आहे.

 झाड रोप आणण्यापासून त्याला खत पाणी घालून मोठी करे पर्यंत सर्व जबाबदारी आम्ही पार पाडायची आणि भल्या सकाळी फिरण्याच्या निमित्ताने येणारी ही भामटी मंडळी फुलं चोरून नेणार हे चूक आहे. देवाला ताजी फुलं पाहिजे असतील तर चार कुंड्या घेऊन त्यात फुलझाडे लावावीत. देवाच्या नावाने चोरीचे उद्योग संबंधीतानी बंद करावेत.- चंद्रशेखर गाडगीळ, गुरुवार पेठ

टॅग्स :satara-acसातारा