शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

गो कोरोना गो स्पर्धेचा निकाल जाहीर, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:41 IST

Coronavirus,Competition, Results, Student, satara लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना बराच मोकळा वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग होण्याबरोबरच विद्यार्थी-पालक सहभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात छोट्या गटातून साई पवार आणि वेदांती जाधव तर मोठ्या गटातून ज्ञानेश्वरी बाबर आणि आर्या रसाळ प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.

ठळक मुद्देगो कोरोना गो स्पर्धेचा निकाल जाहीर, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद : सजग पालक व जायन्टस ग्रुप आॅफ साताराचा उपक्रम

सातारा : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना बराच मोकळा वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग होण्याबरोबरच विद्यार्थी-पालक सहभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात छोट्या गटातून साई पवार आणि वेदांती जाधव तर मोठ्या गटातून ज्ञानेश्वरी बाबर आणि आर्या रसाळ प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.लॉकडाऊनच्या काळात सजग पालक सामाजिक संस्था आणि जायन्टस ग्रुप आॅफ साताराच्या माध्यमातून केलेले ह्यगो कोरोना गोह्ण या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नातेवाइकांमध्ये कोरोनाबाबत फोन आणि पत्राद्वारे जागृती करणे, सूर्यनमस्कार करणे, छंद जोपासणे, आदर्श व्यक्तिबद्दल ३ मिनिटे बोलणे, वाचलेल्या पुस्तकाचा सारांश सांगणे यासह या सुटीने मला काय दिले, याविषयावर निबंध लिहिणे आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत सातारा, पुणे, मुंबई, ठाणे बारामती, सांगली, कोल्हापूर येथील मुलांनी सहभाग घेतला. याचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि समीर शेख यांच्या हस्ते झाला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे पर्व पहिले, लहान गट : साई पवार, रिया भद्रेश शाह, अक्षरा कोळेकर. मोठा गट ज्ञानेश्वरी बाबर, नरीन भट्टड, ईशिता जगताप. पर्व दुसरे, लहान गट : वेंदाती जाधव, श्रीनिवास आयाचित, विराट क्षीरसागर, मोठा गट : आर्या रसाळ, राजवर्धन दगड, वेदांत थोरवे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.श्रीनिवास आयाचित सामाजिक बांधिलकीसातारा येथील सजग पालक आणि जायंटस ग्रुप आॅफ साताराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या गटात विजेता ठरलेल्या श्रीनिवास आयाचित याने बक्षिसातून मिळालेली रक्कम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केली. कोविडशी लढा देताना प्रशासनाला मदत करण्यासाठी स्वत: मिळविलेल्या पैशांतून सेवा करण्याचं ठरवून त्याने ही रक्कम दिली. त्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडूनही कौतुक करण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरonlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्र