शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

By admin | Updated: October 19, 2015 23:44 IST

मसूरला शेतकरी मेळावा : शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करणार

मसूर : ‘साखर कारखानदारांनी ऊसदर नियंत्रण अध्यादेशानुसार ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम द्या; अन्यथा बेकायदेशीररीत्या तुकडे करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, त्यासाठी कसलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.मसूर, ता. कऱ्हाड येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक वसंतराव जगदाळे, आत्माराम जाधव, हिंदुराव चव्हाण, तानाजीराव देशमुख, संजूकाका कदम, संदीप इंगवले, रेखा वायदंडे, बजरंग जाधव, संतोष पाटील, दिनकर पाटील, गणेश जाधव, रवींद्र सूर्यवंशी, बाळासाहेब कांबिरे यांची उपस्थिती होती.खोत म्हणाले, ‘कारखानदारी अडचणीत होती, तेव्हा सहा हजार कोटींचे पॅकेज हे केवळ खा. राजू शेट्टींमुळेच मिळाले, याचे भान कारखान्यांनी ठेवावे. कारखान्यांनी दराचा खरा कायदाच शेतकऱ्यांना कळू दिला नाही. सर्वसामान्य सभेला काय अधिकार आहेत? शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत. सभेत भाडोत्री गुंड व संचालकांचे बगलबच्चे मंजूर-मंजूर म्हणतात. धनदांडग्यांच्या गदारोळात शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो. मूठभर लोकांनी घेतलेला निर्णय सर्वांनी बंधनकारक मानायचा का? मात्र, त्यासाठी सहकार कायदा आहे. आजवरचे दर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनरेट्यामुळेच मिळाले आहेत, त्यासाठी आंदोलने, रास्ता रोकोचा संघर्ष करावा लागला. ऊसदरानंतर मळी, अल्कोहोल, दारू, बगॅससह आदी हिशेबाचे आॅडिटही काढणार आहे. कारखानदारी शासनाशी पडद्यामागे हातमिळवणी करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. अंजनकुमार घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. विकास पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)काँग्रेस-राष्ट्रवादी ही सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, अशी टीका करून खोत म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्राने साखर सम्राटाविरोधात कौल देऊन भाजप-सेनेला निवडून दिले, हे राज्य व केंद्र सरकारने विसरू नये त्यांना कारखानदारी हवी की शेतकरी हवा, हे ठरवावे; अन्यथा जनता तुम्हालाही उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर ३४ गुन्हे दाखल आहेत, ते लालदिव्याच्या हव्यासापोटी नाहीत. सामान्य शेतकरी हाच माझा लालदिवा आहे. - सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व एफआरपीची एकरकमी रक्कम मिळण्यासाठी या जनहिताच्या आंदोलनात सर्वांनी राजकारण गट,तट न पाहता साखरसम्राटांना ताळ्यावर आणण्यासाठी २६ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वांनी सहभागी व्हावे. - मनोज घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना