शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:03 IST

वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे.

सडोली (खालसा) : वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानासुद्धा शिक्षण विभागाला जाग कधी येणार, असा सवाल पालक करीत आहेत.

वाशी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या मुलींसाठी कन्याशाळा, तर मुलांसाठी विद्यामंदिर या दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांत सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या दोन्ही शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, तर शाळेच्या मुलांनी अनेक क्रीडा प्रकारांत मोठी मजल मारली आहे.या शाळेच्या पाच खोल्यांचे बांधकाम १९९६ साली झाले आहे. पण ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने वीस वर्षांच्या अगोदरच खोल्यांच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. याही परिस्थितीतीत मुली शिक्षणाचे धडे गिरवत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.प्राथमिक शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे निव्वळ दप्तर दिरंगाई व भोंगळ कारभारामुळे गेली चार वर्षे शाळेला मरणयातना सोसाव्या लागत आहेत, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच एकाच खोलीमध्ये दोन दोन वर्ग भरवले जातात.या शाळेतील इमारतीच्या दुरवस्थेचा फायदा घेऊन काही ग्रामस्थांनी चक्क जनावरे बांधण्यासाठी शाळेचा वापर सुरू केला असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालकांच्या संतापात अधिकच भर पडलीआहे.नेतेमंडळींनी काय केलेया गावातील नागरिकांनी गेल्या वीस वर्षांत जिल्हा परिषद अध्यक्ष ते पंचायत समिती सदस्य अशी मोठ मोठी पदे उपभोगली असूनसुद्धा शाळेची अवस्था बिकट बनली आहे. या नेतेमंडळींनी शाळेसाठी काय केले, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.शाळा दुरुस्तीसाठी व्यवस्थापन समितीने या अगोदरही अनेकवेळा प्रस्ताव पाठवले, पण शिक्षण विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.- के. एस. रानगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वाशी.शाळेची गुणवत्ता व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेची शैक्षणिक प्रगती झाली आहे; परंतु शिक्षण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे आमच्या मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करणार आहे.- रणजित पाटील, पालक 

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा