शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भुरट्यांच्या अंगात पुन्हा आलंय आमदारकीचं भूत

By admin | Updated: August 12, 2014 23:14 IST

शिवेंद्रसिंंहराजेंची टीका : सोनगावात विरोधकांची घेतली हजेरी

सातारा : ‘हलगी वाजली की काही जणांच्या अंगात येते, तसे निवडणुका आल्या की काही जणांच्या अंगात आमदारकीचे भूत शिरते. मात्र, हा नरेंद्र दाभोलकरांचा जिल्हा आहे. आमदारकीचे हे भूत जनताच उतरवेल,’ अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी केली.सोनगाव येथे सातारा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, किशोर ठोकळे, रवी साळुंखे, वनिता पोतेकर, पंचायत समितीचे सभापती धर्मराज घोरपडे, सदस्य सूर्यकांत पडवळ, सुदर्शना चव्हाण, माजी सभापती अरविंंद चव्हाण, अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप निंंबाळकर, मोहन साळुंखे, रामचंद्र चव्हाण, दिनकर पवार, दादासाहेब शेळके, मारुती कदम उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले, ‘आपण कुणालाही मदत मागायला गेलोच नाही, तर मदत हवीच कशाला,’ असा सवाल करून ते म्हणाले, ‘अशा भुरट्यांच्या पाया पडायला मी कदापि जाणार नाही. दिल्लीतून निधी आणण्यासाठी मला कोणा एजंटाची अथवा पीएची गरज नाही. लोकसभेची निवडणूक होऊन चार महिने झाले. त्यावेळच्या टोप्या आणि झाडू सगळं काही आता गायब झालंय. निवडणुकीपुरते हे लोक येतात आणि हाताला काही लागतंय का, डाळ शिजतेय का हे पाहतात. निवडणूक झाल्यानंतर यांना रस्त्यातील खड्डे, कोसळलेल्या दरडी अथवा लोकांचे प्रश्न का दिसत नाहीत,’ असा सवाल त्यांनी केला. बाबाराजे विचारमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. विक्रम पवार यांनी प्रास्ताविक केले. अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कमळ हाती घ्याल, तर चिखलात बुडाल!‘कमळ हातात घेतलं की लोक आपल्या मागे येतील, असे काहीजणांना वाटत आहे. मात्र, कमळ आणायला गेला तर चिखलात बुडून मराल,’ असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला. मोदी लाट असूनही लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडूून आले आहेत. उदयनराजेंचे इंजेक्शन लगेच असर करते; पण मी दिलेल्या इंजेक्शनमुळे डायबिटिस होतो हे विरोधकांनी ध्यानात ठेवावे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. बिचुकले पाचवीलाच पुजलेला...‘निवडणूक आली की काही लोक वाट्टेल ते आरोप करत सुटतात. जर आम्ही भ्रष्टाचार केला आहे तर पुरावे गोळा करा आणि आमच्यावर गुन्हा दाखल करा. माझ्या विरोधात कोणीही आणि कितीही उमेदवार उभे राहिले तरी मी घाबरत नाही. भाजप, सेना नाहीतर आमचा मित्र बिचुकले आहेच. तो तर आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे,’ अशी कोटी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.