शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Lok Sabha Election 2019 जिल्ह्यात घोंगावतंय भाऊबंदकीचं वादळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:48 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भाऊबंदकीचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भाऊबंदकीचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी या भाऊबंदकीला खतपाणी घातले आहे. आता सख्खा भाऊ पक्का वैरी म्हणण्याची वेळ काहींवर आली आहे, तर काही जणांचे कबके बिछडे..आज कहाँ आके मिले, असं म्हणत पुन्हा मनोमिलन झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या घराण्यात सातारा शहराची सत्ता वर्षानुवर्षे आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. दोन राजे व त्यांच्या कार्यकर्त्यांमधून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती वर्षानुवर्षे आहे. मधल्या काळात राजेंचे मनोमिलन झाले. दोघांच्या अध्यक्षतेखालील आघाड्यांनी सातारा पालिकेची सत्ता मिळवली. मात्र मनोमिलन तुटले आणि दोघांत दरार आली. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठे वैमनस्य निर्माण झाले. शहरातील राजेंचे गट नेहमीच एकमेंकावर फुरफुरत राहिले. मात्र, ऐन निवडणुकीत साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन झाले. मनोमिलनाच्या दुसºया अध्यायाचा श्रीगणेशा दोन्ही आघाड्यांच्या एकत्रित मेळाव्यात झाला. दोन्हीकडून एकमेकांना मदत करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. वैर सोडून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे एकत्रित कामाला लागले आहेत.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दंड थोपटलेले शिवसेना-भाजप युतीचे नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादी, भाजप असा प्रवास करून शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेत प्रवेश अन् लगेच उमेदवारी...असे गणित त्यांनी साध्य केले.राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेचे आमदार केले होते. भाजपने त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यांनी अत्यंत वेगाने पक्ष बदलले; मात्र त्यांचे धाकटे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील हे मात्र राष्ट्रवादीतच राहिले आहेत. आता सख्खा भाऊ जरी निवडणुकीला उभा राहिला असला तरी रमेश पाटील यांनी मात्र पक्षासोबत राहणे पसंद केले आहे. नरेंद्र पाटील यांनी जेव्हा साताºयात येऊन शिवेंद्रसिंहराजेंसोबत मिसळ खाल्ली त्याच्या काही दिवसांनंतरच पाटण तालुक्यात उदयनराजेंसोबत रमेश पाटील यांनी उघड्या जीपमधून रॅली काढली.माण तालुक्यातील गोरे बंधूंची भाऊबंदकीही सर्वांनाच सर्वश्रूत आहे. आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. माण-खटाव विधानसभा मतदार संघात हे बंधू एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. एकमेकांच्या विरोधात लढणे, हा एकमेव कार्यक्रम घेऊन त्यांच्या राजकीय हालचाली सुरू असतात.मागील विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे हे काँगे्रसचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात रासपमधून शेखर गोरे लढाईला उतरले होते. माण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत या दोन बंधूंमध्ये कायमच खणाखणी सुरू असते.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र दोन्ही भावांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे काम करण्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. दोघांनीही राष्ट्रवादीला विरोध करत स्वतंत्रपणे आपली यंत्रणा माढा लोकसभा मतदार संघात कामाला लावली आहे. भाजपचा प्रचार करत असताना एकाच व्यासपीठावर येणे मात्र टाळले आहे. माढा लोकसभा मतदार संघातील एकाच उमेदवाराचा दोघेही प्रचार करत असले तरी एकमेकांतील वैरत्व त्यांनी कायम ठेवले आहे.हा निव्वळ योगायोग...माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना गोरे बंधूंनी दिलेल्या पाठिंब्याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हा निव्वळ योगायोग असल्याचे स्पष्टीकरण शेखर गोरे यांनी केले. मात्र, आ. जयकुमार गोरे यांना कायम विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या व्यासपीठावर जयकुमार असतील त्या व्यासपीठावर जाणार नाही, स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून लोकसभेचा प्रचार करणार असल्याचेही शेखर गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक