शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती; मायणीचे संशोधक प्रा.राजाराम माने आणि डॉ.शोएब शेख यांनी मिळविले पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:51 IST

संदीप कुंभार मायणी : मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती आणि याच कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचे संशोधन करण्यात ...

संदीप कुंभारमायणी : मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती आणि याच कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाला अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहे. मूळ मायणीचे असलेले आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या राजाराम माने व डॉ.शोएब शेख यांनी हे पेटंट मिळविले आहे. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन ऊर्जा निर्मितीसाठी उपयोगी ठरू शकतो, असा शोध प्रा.राजाराम सखाराम माने आणि डॉ.शोएब मोहम्मद शेख यांच्या टीमने लावत हे पेटंट मिळविले.या शोधाचे पेटंट किंग साऊद विद्यापीठ, सौदी अरेबिया यांच्याकडून वित्तीय साहाय्य घेऊन प्राप्त केले आहे. पेटंट मिळविलेल्या संशोधनाच्या मुख्य अंशांमध्ये, मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरियल तयार करणे, तसेच त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले आहे.या शोधाच्या माध्यमातून प्राध्यापक माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभिनव पद्धतीने ऊर्जा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तयार केलेल्या कार्बन नॅनो मटेरियलचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी करण्यात आला आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठी होऊ शकतो. हायड्रोजन आधारित ऊर्जा प्रणालीचा वापर पर्यावरणास अनुकूल असून, त्याचा मोठा फायदा ऊर्जा क्षेत्रात होऊ शकतो.या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर आणि प्राध्यापक कुंभारखाणे यांनी डॉ.माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या डॉ.माने आणि त्यांच्या गटाचे संशोधन बोअरच्या पाण्यातून मेटल हॅलाइड वेगळे करण्याच्या पद्धतीवर सुरू आहे. या पदार्थाच्या कार्बनसोबत होणाऱ्या संयोगाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. हे संशोधन भविष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठू शकते, ज्यामुळे ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात नवा बदल होईल. डॉ.माने यांना भारतीय मराठी विज्ञान परिषदेत वैशिष्ट्यपूर्ण संशोधक म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

महाविद्यालयांशी करार होणारमानवी मूत्र एकत्रित करण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, सरकारी कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांशी करार करता येणार आहे. त्याबरोबरच ज्या लोकांना शुगर आहे, त्यांच्या मूत्रामध्ये क्लोरिनेटेडचे प्रमाण अधिक असते, तर त्याचाही उपयोग आपल्याला या ऊर्जा निर्मितीसाठी करता येणार आहे. याशिवाय बाजारात १ किलो हायड्रोजनची किंमत ५०० ते ६०० रुपये आहे. आपल्याला मूत्रापासून ते अगदी १५० रुपयांमध्ये १ किलो हायड्रोजन मिळविता येणार आहे.

नैसर्गिक संसाधनापासून इंधन निर्मिती असा उद्देश होता. इलेक्ट्रिकल गाड्यांमध्ये हायड्रोजन निर्मितीसाठी याचा वापर होतो. मानवी मूत्रापासून ऊर्जा साठवणे आणि त्याचा वापर करणे असे काम आम्ही केले. बॅटरी म्हणूनही याचा वापर होईल आणि हायड्रोजन म्हणूनही वापर करता येईल. आता ऊर्जा साठविणे आणि त्याचा वापर करून हायड्रोजनवर चालणारी गाडी चालविणे असा प्रयत्न असणार आहे. - प्रा.राजाराम माने, संशोधन, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNandedनांदेडResearchसंशोधन