शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: घाटातून गव्यांचे कळप दिवसा रस्त्यावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

By दीपक शिंदे | Updated: March 7, 2024 15:52 IST

सणबूर : गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक पठार परिसरातील शिद्रुकवाडी रस्त्यावर दहा ते बारा गव्यांचा कळप सकाळ - संध्याकाळी फिरत ...

सणबूर : गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक पठार परिसरातील शिद्रुकवाडी रस्त्यावर दहा ते बारा गव्यांचा कळप सकाळ - संध्याकाळी फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ढेबेवाडी - नवास्ता मार्गावरील शिद्रुकवाडी फाट्यातून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गव्यांचे कळप रस्त्यावरच उभे असल्याने रस्त्याने दररोज ये-जा करणारे शिद्रुकवाडी येथील राजाराम म्होप्रेकर यांना धडकी भरली. त्यांनी दुचाकी जागेवरच उभी केली. थोड्या वेळाने गव्यांचा कळप टेळेवाडी गावच्या दिशेने गेला. सध्या डोंगर पूर्णपणे रिकामे झाल्याने वन्यप्राणी डोंगरातून गावाच्या दिशेने येत आहेत. चार दिवसांपूर्वी बोरगेवाडी - सळवे येथील शेतकऱ्याची गाय गव्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे जनावरे चरायला घेऊन जाणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. परिसरातील भराडीचा माळ नावाच्या शिवारात हे गव्यांचे कळप सतत फिरताना लोकांना दिसत आहेत. त्यामुळे जनावरे चारायला जाणाऱ्या लोकांना जनावरे सोडणे कठीण होऊन बसले आहे. गव्यांचे कळप बहुले, टेळेवाडी, मारुलहवेली गावाच्या डोंगराच्या दिशेने शिद्रुकवाडीकडे येत आहेत. ते रस्त्यातच थांबत असल्याने लोकांची घाबरगुंडी उडत आहे. या गव्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.डोंगर कपारीत विखुरलेल्या आणि जंगलाने वेढलेल्या या परिसरात शिद्रुकवाडी या तीन वस्त्या लागून आहेत. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर आहे. या प्राण्यांकडून पिकांचे, पाळीव जनावरांचे नुकसान होत आहे. वर्षागणिक गव्यांचा उपद्रव वाढत चालल्याने शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड यासह खरीप व रब्बी हंगामातील विविध पिके शेतकरी घेतात. मात्र, गव्यांच्या उपद्रवामुळे शेतातील पीक कापणी व मळणी होऊन घरापर्यंत येईलच, याचीही शाश्वती आता उरलेली नाही.

शिद्रुकवाडी परिसरात गव्यांचे कळप रस्त्यात मध्येच उभे राहत असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. अगोदरच डुकरे व वानरे आणि बिबट्यामुळे लोक त्रासलेले असताना आता त्यात गव्यांची भर पडली आहे. -राजाराम म्होप्रेकर, ग्रामस्थ, शिद्रुकवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर