शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे हस्तगत

By admin | Updated: September 15, 2015 00:44 IST

परप्रांतीयास अटक : कऱ्हाडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची सैदापुरात कारवाई

कऱ्हाड : सैदापूर येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय युवकाकडून पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी दुपारी ही कारवाई केली. उमेश शिवाप्पा शिंदे (वय २९, मूळ रा. चडचण, ता. इंडी, जि. विजापूर, सध्या रा. सैदापूर) असे आरोपीचे नाव आहे. सैदापूर येथील उमेश शिंदे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एच. एन. काकंडकी यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह गुन्हे शाखा उमेश शिंदे याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. उमेश शिंदे हा एका व्हॅनवर चालक म्हणून काम करतो. दररोज तो ती व्हॅन घेऊन शहरातून फिरत असतो. गुन्हे शाखा त्याच्या दैनंदिन हालचालींची माहिती घेत होती. अखेर त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह सहायक फौजदार ए. पी. पवार, हवालदार पी. के. कदम, नाईक पी. बी. पवार, देवानंद खाडे, कुलदीप कोळी, राजू कोळी, अमोल पवार, राजू पाटोळे, वैभव डांगरे यांनी सैदापूर येथे उमेश शिंदे याच्या घरावर छापा टाकला. उमेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूलविषयी चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी घरासमोर उभ्या असलेल्या व्हॅनची (एमएच ०८ - ९५३०) झडती घेतली. त्यावेळी व्हॅनमध्ये पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होते. दरम्यान, उमेश शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नसला तरी त्याचा एक नातेवाईक परराज्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. संबंधित पिस्तूल उमेशने त्या नातेवाइकाकडून आणली आहे का? याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. तसेच तो इतर गुन्हेगारी व्यक्तींशी संपर्कात आहे का? याचीही खातरजमा केली जात असल्याचे सहायक निरीक्षक काकंडकी यांनी सांगितले. सहा वर्षांत ३५ रिव्हॉल्व्हर हस्तगत कऱ्हाडात रिव्हॉल्व्हर व गावठी कट्ट्याशी संबंधित अनेक गुन्हे यापूर्वी उघडकीस आले आहेत. गत सहा वर्षांमध्ये उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तब्बल ३५ रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टे हस्तगत केले आहेत. २००९ मध्ये ११, २०१० मध्ये ५, २०११ मध्ये ३, २०१२ मध्ये २, २०१३ मध्ये ५, २०१४ मध्ये ४, तर २०१५ मध्ये ४ रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केली आहेत. परप्रांतीय ‘कनेक्शन’ कऱ्हाड शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत आजपर्यंत अनेक पिस्तुले हस्तगत केली आहेत. त्यामध्ये काही स्थानिक व परप्रांतीयांनाही अटक झाली आहे. पिस्तूल परराज्यातून येथे पुरविल्या जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांकडे आहे. मात्र, या साखळीच्या मुळापर्यंत अद्यापही पोलीस पोहोचलेले नाहीत. आणखी एकजण ताब्यात अटकेत असणाऱ्या उमेश शिंदे याच्याकडे पोलिसांनी पिस्तुलाबाबत कसून चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून राजू गेणू चव्हाण या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव निष्पन्न झाले. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकून राजू चव्हाण याला ताब्यात घेतले असून, हे पिस्तूूल कोणी व कशासाठी आणले, याची महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.