शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदी कारवाईचा कचरा !

By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST

कऱ्हाडात प्रमाण वाढले : पालिकेकडून दिखाव्यापुरती कारवाई; नागरिकांचे आरोग्य धोक्यात; कडक उपाययोजनांची गरज

कऱ्हाड : शहरातील नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाणी इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिकपिशव्यांचा कचरा पडत आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पालिकेकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसून याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी कऱ्हाड येथील जिमखान्यातर्फे नुकतेच ह्यपर्यावरण जनजागरण अभियानह्ण राबविण्यात आले आहे. तरीही या अभियानाला पालिका किती सहकार्य करते हा संशोधनाचा विषय आहे.शहरातील प्रदूषणाला कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर पालिकेकडून कठोर कारवाई करणे गरजेचे असते. मात्र, सध्या पालिकेकडून शहरातून प्लास्टिक पिशव्या व कचरा हद्दपार करण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी व प्लास्टिक कचऱ्यापासून निर्माण होणारे आजार यांचे प्रमाण वाढले आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी पडणाऱ्या कचऱ्यामध्ये ७५ टक्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्लास्टिक आढळत आहे. तर शहरातील दुकानांमधून सर्रासपणे पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्यांची विक्री होत आहे.त्यातून शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात वाढत असणाऱ्या प्लास्टिक तसेच इतर कचऱ्यापासून उद्भवणारे आजार, दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील बाजारपेठेतील दुकानदार, व्यापाऱ्यांवर पालिकेने यापूर्वी कारवाई केली होती. पालिकेने केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या हस्तगत केल्या होत्या.मात्र, त्यानंतर पालिकेची कारवाई अचानक थांबविण्यात आली. नगरपालिका हद्दीत हॉटेल, चायनिज, वडापाव विक्रेते, कापड दुकानदार, भांडी विक्री करणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांची संख्या हजारोच्या घरात आहे. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो.त्यामुळे शहरात प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.शहरातील भाजी मंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदीर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, बाराडबरी परिसर, एसटी स्टँड परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दुरध्वनी केंद्र याठिकाणी रोजच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा कचरा साठत आहे.याठिकाणी पडत असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा परिणाम हा त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांवर होत आहे. त्यामुळे पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आह, अशी प्रतिक्रिया कऱ्हाडातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)कसा शोधलागला ?प्लास्टिक प्रथम अ‍ॅलेक्झेंडर पार्कस याने १८६२ मध्ये जगासमोर आणले. सेल्युलोज नावाच्या एका आॅरगॅनिक मटेरिअलपासून हे तयार केले. तेव्हा त्यास ह्यपार्को साइन ह्ण या नावाने ओळखले जात होते. १९६० च्या सुमारास पहिली प्लास्टिकची कॅरीबॅग बाजारपेठेत आली. तर १९८० व त्यापुढील काळात प्लास्टिक कॅरीबॅग रीतसर सर्वत्र वापरली जाऊ लागली.प्लास्टिकमुळेहोणारे दुष्परिणामप्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचे दुष्परिणाम तर होतात त्याचप्रमाणे मानवी शरीरालाही त्याचा त्रास होतो. उघड्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मार झाल्यास त्यातून वायू बाहेर पडून हवा प्रदूषित होते. हवा प्रदूषणामुळे कॅन्सर, किडनी व फुफ्फुसे निकामी होणे, बे्रन डॅमेज, नर्व्ह सीस्टिम ब्रेकडाऊन होणे अशा प्रकारे प्लास्टिकचा मानवी शरीरावर परिणाम होतो.कारवाई करण्याअगोदरच माहिती दिली जाते.शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असलेल्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी व प्लास्टिक निर्मूलन पथक गेले असता. दुकानदारांकडे कारवाई दरम्यान जास्त माल सापडत नाही. कारवाईबाबत कालच समजले होते. असे अजब उत्तर कारवाई पथकाला दुकानदारांकडून दिले जाते.कऱ्हाड पालिकेकडून प्लास्टिक पिशव्या वापराबाबत कडक कारवाई करणे गरजेचे आहे. कारवाईमध्ये सातत्य नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच यामुळे परिणामी प्लास्टिक पिशव्याचा कचराही वाढून त्याचे दुष्परिणाम लोकांना सहन करावे लागत आहे.- जालिंदर काशिद अध्यक्ष,एन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब, कऱ्हाडह्यआपलेच दात आणि आपलेच ओठह्णकऱ्हाड पालिकेकडून शहरातील पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याकडे मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली जाते. वर्षभरात एखाद दुसरी कारवाई करत प्लास्टिक निर्मूलन केल्याच्या घोषणा अधिकाऱ्यांकडून दिल्या जातात. यात विशेष गोष्ट म्हणजे पालिकेतील काही कर्मचाऱ्यांकडूनच कारवाईबाबत माहिती एकदिवस अगोदर दुकानदार व व्यापाऱ्यांना दिली जाते. त्यामुळे कारवाईचा फार्स होतो.तक्रार निवारणासाठी ह्यटोल फ्री क्रमांकह्णकऱ्हाड शहरात कचऱ्याबाबत व पालिकेतील समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी कऱ्हाड पालिकेचा टोल फ्री क्रमांक २४ तास कार्यरत आहे. पालिकेच्या या १८००२३३५३१६ टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ पालिकेकडून समस्या, तक्रारीबाबत दखल घेतली जाणार आहे.