शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

Ganpati Festival -झेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:33 IST

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकºयांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत मात्र झेंडू फुलला असून, दराने शंभरी ओलांडली आहे.

ठळक मुद्दे उत्पादन कमी असल्याने झेंडू फुलला...,लॉकडाऊनमुळे बहुतांश बाजारपेठा बंदझेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

रशिद शेखऔंध : सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत मात्र झेंडू फुलला असून, दराने शंभरी ओलांडली आहे.फुलांची बाजारपेठ ही मुंबई, पुण्यात आहे. मधल्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पाठवता येत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.

सध्या तरी डोक्यावरील कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे झेंडूची लागवड केली नाही. तरीदेखील काही शेतकऱ्यांनी धोका पत्करून धाडसाने लागवड केली आहे. मात्र, धोका घेतलेल्या शेतकऱ्यांना सध्या तरी चांगले दिवस आले आहेत.

मुंबईतील दादरच्या फूल मार्केटमध्ये झेंडूने दराच्या बाबतीत शंभरी ओलांडली आहे. दर वाढला असला तरी आवक मात्र कमी आहे. श्रावण महिना, गणपती उत्सव, दसरा आणि दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असते; परंतु बाजारपेठेतील आवक वाढली तर शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने माल विकावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे खर्चाचा ताळमेळ बसत नाही. झेंडू हे दोन महिन्यांत सुरू होणारे पीक आहे.खटाव तालुक्यात देखील यंदा अगदीच बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. लागवड कमी असल्याने बाजारात सध्या आवक कमी आहे. त्यातच मंदिरे बंद असल्याने फुलाला मागणी कमी होईल, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली नाही.पिवळ्या रंगाला जास्त मागणीसध्या शेतकऱ्यांनी श्रावणी, गोल्ड स्पॉट-२, अष्टगंधा, कलकत्ता, टॉलयलो, नामधारी, टॉलआॅरेंज आदी जातीच्या केशरी आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली आहे. बाजारपेठेत सध्या पिवळ्या रंगाच्या झेंडूला जास्त मागणी असून, दर १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. नर्सरी मालकाने रोपे तयार केली असली तरी यंदा शेतकऱ्यांनी लागवडीसाठी दाखवली. उदासिनतेमुळे रोपांची विक्री झालेली नाही. एका एकरात अंदाजे सात हजार रोपांची लागवड केली जाते.

आवक कमी असल्याने दरवर्षी पेक्षा यंदा दर चांगला आहे. पाऊस, आणि कोरोनाची आपत्ती यामुळे लागवड कमी आहे त्यामुळे दसरा दिवाळीत देखील झेंडूचा दर चांगला राहिल. शिवाय धार्मिक स्थळे खुली झाली तर दर आणखीन सुध्दा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.-रणजित येवले, झेंडू उत्पादक शेतकरी,वडी, ता. खटाव

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSatara areaसातारा परिसर