शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:13 IST

महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा वर्षांपासून हा उत्सव साजरा करत आहे.

ठळक मुद्दे लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागतकेळघरमधील कुटुंबाने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती

सायगाव : महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा वर्षांपासून हा उत्सव साजरा करत आहे.केळघर येथील गणेश वसंतराव गाडवे हे नोकरीनिमित्त लंडन येथे स्थायिक आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठीजन गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव निमित्ताने महाराष्ट्राच्या अनोख्या परंपरेची जगाला ओळख होत आहे.

यावर्षी कोरोनाचा कहर असल्याने लंडनमधील गणेशोत्सव साजरा करायला मर्यादा आल्याचे गणेश गाडवे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सचा अवलंब करुन यावर्षी लंडनमध्ये बाप्पाचा उत्सव सुरू आहे. गणेश व त्यांची पत्नी मोनिका हे दोघेही लंडनमध्ये नोकरी करत आहेत. आपल्या संस्कृतीचा विसर न पडता ते गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात.विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी बसवलेली गणेश मूर्ती शाडूपासून बनवली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव त्यानिमित्ताने साजरा होतोय. प्रसादाचे मोदक, लाडू ही घरीच तयार केले जातात. लंडनमध्ये दुर्वा, खाऊची पाने ही सहजपणे उपलब्ध होतात. गेल्या वर्षी त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती गणेशोत्सव साजरा करताना साकारली होती. तसेच लंडन ब्रिजचा देखावा मागील वर्षी केला होता.

आपल्या घरापासून लांब असूनही गोऱ्या साहेबांच्या देशात मराठमोळा गणेशोत्सव तिथल्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे. लंडनमधील हा अनोखा मराठमोळा गणेशोत्सव राज्याच्या परंपरेची साक्ष देत आहे.

आम्ही इंग्लडमध्ये राहूनही कोरोनजन्य परिस्थिती असतानाही भारतीय संस्कृतीतील गणरायाचा उत्सव साजरा करीत आहोत. बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न झालेले पाहून मनाची शक्तीही वाढवली आहे.- गणेश गाढवे,मूळ केळघर, सध्या लंडन

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSatara areaसातारा परिसर