शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गँगस्टर’सोबत दरोडेखोरांची ‘सोशल’ दहशत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:23 IST

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांपैकी काहीचे फोटो दिल्लीतील एका ‘गँगस्टर’सोबत असून, या फोटोचे ‘मिक्सिंग’ करून व्हिडीओ बनविण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘यू ट्यूब’वरही संशयितांनी ‘अपलोड’ केला आहे. व्हिडीओमध्ये ‘गँगस्टर’, ‘भाई’, ‘ग्रुप’ असा उल्लेख असून, गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या बातम्यांची कात्रणे, पिस्तूल, जिवंत काडतुसांची छायाचित्र व्हिडीओत ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांपैकी काहीचे फोटो दिल्लीतील एका ‘गँगस्टर’सोबत असून, या फोटोचे ‘मिक्सिंग’ करून व्हिडीओ बनविण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘यू ट्यूब’वरही संशयितांनी ‘अपलोड’ केला आहे. व्हिडीओमध्ये ‘गँगस्टर’, ‘भाई’, ‘ग्रुप’ असा उल्लेख असून, गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या बातम्यांची कात्रणे, पिस्तूल, जिवंत काडतुसांची छायाचित्र व्हिडीओत ‘मिक्स’ करण्यात आली आहेत. त्याद्वारे ‘सोशल’ दहशत निर्माण करण्याचा या टोळीचा प्रयत्न दिसून येत आहे.कºहाडनजीक वडगाव हवेली गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. या दरोडेखोरांना पोलिसांनी काही तासांतच गजाआड केले. त्यानंतर दरोडेखोरांची दिल्लीपर्यंतची ‘कनेक्शन’ पोलिसांच्या समोर आली. पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांपैकी चारजण दिल्ली तसेच हरियाणाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत. सातारा जिल्ह्यातील एक युवक काही कामानिमित्त दिल्लीत गेला होता. त्यावेळी त्याची या टोळीतील काहीजणांशी ओळख झाली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांशी संधान बांधून सातारा, सांगली जिल्ह्यांना ‘टार्गेट’ केले. पोलिसांच्या माहितीनुसार गत महिन्यापासून ही टोळी सातारा तसेच सांगली जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास आहे. आठ दिवसांपूर्वीच या टोळीने कडेगावमध्ये गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकला होता. तेथूनही ते दुचाकीवरून पसार झाले होते. पोलिसांनी प्रयत्न करूनही त्यांचा सुगावा लागत नव्हता. अशातच त्यांनी कºहाड परिसरात दरोड्याचा कट रचला. त्यानुसार काही दिवसांपूर्वी सर्वजण कºहाडात आले. शहरातील एका लॉजमध्ये रूम भाडेतत्त्वावर घेऊन ते त्याठिकाणी राहिले.टोळीतील काहीजणांनी शुक्रवारी कºहाड शहरासह आसपासच्या पेट्रोल पंपांची रेकी केली. कोणता पेट्रोल पंप शहरापासून लांब आहे, वर्दळ कमी आहे, तसेच पळून जाण्यासाठी सोयीचा आहे, या सर्व गोष्टी दरोडेखोरांनी तपासल्या. त्यावेळी वडगाव हवेलीचा दत्तकृपा पंप त्यांच्या दृष्टीस पडला. दरोडेखोर शुक्रवारी दुपारी या पंपापासून काही अंतरावरच रेकी करीत थांबले होते. दुपारी रेकी केल्यानंतर त्यांनी रात्री दरोड्याचा कट रचला. त्यानुसार रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते पंपावर पोहोचले. गोळीबार करीत लूटमार करून त्यांनी तेथून पोबारा केला.वडगाव हवेलीतून पळाल्यानंतर दोन दुचाकींवरून दरोडेखोर शेणोली स्टेशनमार्गे सोनसळ घाटातून नेर्लेकडे व तेथून कडेगावहून विटा-कºहाड मार्गे परत कºहाडच्या दिशेने आले. येताना त्यांनी सोबतची शस्त्र अपशिंगे, ता. कडेगाव येथे लपवली. त्यानंतर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कºहाडच्या कृष्णा कॅनॉलवर पोहोचले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. या प्रकरणात सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एकजण अल्पवयीन असून, इतर पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांच्या ‘टीम वर्क’ने टोळी गजाआडदरोड्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्यासह कºहाड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी तातडीने नाकाबंदी करीत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. ओगलेवाडीत दोन पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथून ते निसटले. मात्र, कृष्णा कॅनॉलवर रचलेल्या सापळ्यात दरोडेखोर अलगद अडकले.झाडलेली गोळी शटरवर लागलीपेट्रोल पंपावर आल्यानंतर दरोडेखोरांनी झाडलेली गोळी तेथील शटरला लागली. तसेच पंपमालक दीपक जोशी व इतर कर्मचाºयांना पंपाच्या आॅफिसमध्ये घेऊन दरोडेखोरांनी आतून शटर बंद केले. त्यानंतर डायलॉगबाजी करीत ‘हाथ उपर करो, कॅश निकालो, नहीं तो गोली मार दुँगा’ असे दरोडेखोरांनी दीपक जोशी यांना धमकावले. दरोडेखोरांच्या हातातील शस्त्र पाहून घाबरलेल्या कर्मचाºयांनी तातडीने त्यांच्याकडील रोकड दरोडेखोरांना दिली.दुचाकीचा अपघातदरोडा टाकून पळून जात असताना वाटेत दरोडेखोरांच्या एका दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी घसरून दोघेजण रस्त्यावर पडले. त्यामध्ये एका दरोडेखोराला किरकोळ दुखापत झाली. तर दुसºयाचा शर्ट फाटला. त्यानंतर तो शर्ट त्याने काढून फेकून दिला. बनियनवरच तो दुचाकीवरून पसार झाला होता.व्हिडीओद्वारे ‘हवा’अटक केलेल्या दरोडेखोरांचा एक व्हिडीओ पोलिसांसमोर आला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये दरोडेखोर काही गँगस्टरसोबत असल्याचे फोटो आहेत. तसेच जहाल शब्द वापरून व्हिडीओद्वारे ‘हवा’ करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसते. त्यामुळे दरोडेखोरांचे दिल्लीसह हरियाणा ‘कनेक्शन’ पोलिसांसमोर आले आहे.पिस्तूल, तलवार, दुचाकी जप्तदरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली दोन दुंचाकी (एमएच ५० बीटी ६१२) व (एमएच ११ एके ८०५५) पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच अन्य एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधित दुचाकी गुन्ह्यात वापरलेली नसली तरी आरोपींशी त्या दुचाकीचा संबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे.