शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कास पठारावर लुटमार करणारी टोळी एक वर्षासाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:32 IST

कास पठारावर निर्जनस्थळी जोडप्यांना लुटमार करणाऱ्या टोळतील दोघांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाच तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

ठळक मुद्देकास पठारावर लुटमार करणारी टोळी एक वर्षासाठी तडीपारसार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यावर गुन्हा

सातारा : कास पठारावर निर्जनस्थळी जोडप्यांना लुटमार करणाऱ्या टोळतील दोघांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाच तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.टोळी प्रमुख सोमनाथ शिवाजी जाधव (वय २४), अक्षय नाथाजी गुजर (दोघेही रा. फडतरवाडी, ता. सातारा) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कास पठारावर फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्यांना हे दोघे मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटून नेत होते.

सातारा तालुका पोलीस ठाण्यात या दोघांवर विविध गुन्हे दाखल आहेत. याशिवाय या दोघांनी माहुली, बोरखळ रस्त्यावर थांबून नागरिकांना लुटल्याचेही समोर आले होते. तसेच रेल्वेमध्येही त्यांनी चोरीचे उद्योग सुरू ठेवले होते.या दोघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यामुळे सोमनाथ जाधव आणि अक्षय गुजर याला सातारा, जावळी, कोरगाव, खटाव, कऱ्हाड या तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यावर गुन्हासातारा : बस स्थानकासमोरील रस्त्यावर उभे राहून आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी योगेश विठ्ठल चोरगे (वय ३६, रा. रविवार पेठ, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस कॉन्स्टेबल किशोर तारळकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, योगेश चोरगे हा सायंकाळी सहा वाजता बसस्थानकासमोर उभा राहून दारूच्या नशेत आरडाओरड करत होता. सार्वजनिक ठिकाणी मोठ-मोठ्याने ओरडून शांततेचा भंग केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर