शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात नेत्यांचे फ्लेक्स सुने-सुने!

By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST

सातारा : आचारसंहितेचा फटका इच्छुक उमेदवारांना

सातारा : गणेशोत्सव हा अलीकडे राजकीय व्यासपीठ बनू पाहत आहे. या-ना त्या कारणाने नेतेमंडळी झळकत असतात. विशेषत: पक्षाचे कार्य आणि शुभेच्छाचे फलक ठिकठिकाणी गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतात. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होत असल्यामुळे नेत्यांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. साहजिकच यंदा गणेशोत्सव कालावधीत शहरातील फलक नेतेमुक्त दिसतील. दरवर्षी गणेशोत्सव आला की, नेतेमंडळींना हुरूप चढत असतो. गणेशोत्सवात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा खटाटोप सुरू असतो. फलकाद्वारे पक्षाची आणि स्वत:ची भूमिका मांडून एकप्रकारे नेतेमंडळी गणेशोत्सवाचा प्रचाराचे साधन म्हणून वापर करून घेत असतात. त्यामुळे खास करून नेतेमंडळींना गणेशोत्सव हवाहवासा वाटत असतो.यंदा मात्र नेत्यांच्या उत्सवावर पाणी फिरण्याची शक्यता वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्यांना फलकावर झळकण्याची संधी मिळणार नाही. त्यातूनही काही नेतेमंडळी कायद्याची पळवाट शोधत असतात. गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बनवलेल्या फलकावर कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या नेत्याचा छोटासा फोटो छापला जातो. मात्र, अशा फोटोवरही आचारसंहिता पथकाची करडी नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर पक्षाची चिन्हे, निवडणूक चिन्ह वापरण्यासही बंदी असते; परंतु काहीजण बिनधास्त अशा प्रकारच्या चिन्हांचे प्रदर्शन करत असतात. पोलीस आणि आचारसंहिता पथक अशा बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे.काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अनेकजणांनी अचारसंहितेचा भंग केल्याची उदाहरणे आहेत. त्यावेळी काहीजणांवर गुन्हेही नोंद झाले आहेत. कोणी स्वत:च्या गाडीवर पक्षाचे चिन्ह लावतो तर कोणी डोक्यात पक्षाच्या चिन्हाची टोपी घालून आचारसंहितेचा भंग करत असतो. लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात एकूण १३ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतून मिळालेला धडा आता विधानसभा निवडणुकीत तरी कार्यकर्ते व नेत्यांनी घ्यावा, एवढीच अपेक्षा पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)अनेकदा आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता अथवा पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत असतात. मात्र यातील एकालाही अद्याप याप्रकरणी शिक्षा झाल्याचे कोणालाही ऐकीवात नाही. अचारसंहितेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे या प्रकरणाचे काय होते, याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते. केवळ निवडणुकीपुरतेच अचारसंहिता गुन्ह्यांची चर्चा होते. कालांतराने हे सर्व विसरले जाते. आचारसंहितेचा भंग केल्याचे तहसीलदार आणि पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या फलकाचा फोटो काढला जातो. शहानिशा करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो. निवडणूककाळात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करावे.-राजीव मुठाणे पोलीस निरीक्षक