शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:13 IST

मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो माझ्यावर होईल; परंतु मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे मंगळवार तळ्यातच होईल, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

ठळक मुद्दे मंगळवार तळं माझ्या मालकीचं; विसर्जन याच तळ्यात होणार उदयनराजे भोसले यांची गणेश मंडळांना ग्वाही

सातारा : मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो माझ्यावर होईल; परंतु मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे मंगळवार तळ्यातच होईल, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.|शहरातील मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी पालिकेत बैठकीचे आयोजन केले. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास रजेशिर्के यांच्यासह शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील गणेशमूर्ती विसर्जनावर तोडगा काढण्यात आला. मात्र, दहा फुटांपेक्षा उंच असलेल्या मूर्तींचे कण्हेर धरणाजवळील खाणीत विसर्जन करण्यात यावे, असे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले. आम्ही स्वमालकीच्या असलेल्या मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, असे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०१५ ला शहरातील तीन तळ्यांबाबत जो निर्णय देण्यात आला होता, तो कायम ठेवल्याने मंगळवार तळ्यातील विसर्जनाचा मार्गच बंद झाला असल्याचे सांगितले जात आहे.

वास्तविक ते तळे आमच्या मालकीचे आहे. त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास आमची कोणतीच हरकत नाही, तळ्याचा निर्णय हा आमचा असताना प्रशासन कसा काय याबाबत निर्णय घेऊ शकते? तेरा किलोमीटर लांब मूर्ती विसर्जन करणे मुळीच शक्य नाही. पोलिसांनी लोकांच्या भावनांशी खेळू नये.

उद्या जर मूर्तीची विटंबना झाली तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. प्रदूषणाबाबत जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर उद्योगधंदे, कारखान्यांवर करा. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो माझ्यावर होईल; परंतु मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे मंगळवार तळ्यातच होईल, असेही ते म्हणाले. या तळ्याबाबत खा. उदयनराजे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले