सातारा शहराच्या चौफेर विकासाकरिता निधी मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:48+5:302021-06-25T04:27:48+5:30

सातारा : पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी नगर परिषदेच्या नावे नाममात्र एक रुपयाच्या मोबदल्यात प्रदान केलेल्या जागेवर नगर परिषदेची भव्य ...

Funds should be provided for the development of Satara city | सातारा शहराच्या चौफेर विकासाकरिता निधी मिळावा

सातारा शहराच्या चौफेर विकासाकरिता निधी मिळावा

Next

सातारा : पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी नगर परिषदेच्या नावे नाममात्र एक रुपयाच्या मोबदल्यात प्रदान केलेल्या जागेवर नगर परिषदेची भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीसाठी निधी मंजूर करावा तसेच नगर परिषदेच्या झालेल्या हद्दवाढीच्या चौफेर विकासाकरिता अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विविध विषयांवर सुमारे दोन तास उदयनराजे यांनी चर्चा केली. नगर परिषदेला पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी अत्यंत उदार अंत:करणाने कृपया नाममात्र किमतीमध्ये सुमारे ४० गुंठे जागा नगर परिषदेच्या नावावर करून दिली आहे. आजच्या युगात देखील मातृसंस्था तरी तसे दानशूर कोट्यवधी रुपयांची जागा देतात, हे समस्त सातारकरांचे भाग्य आहे. सध्या ही जागा आताच्या हद्दवाढ झालेल्या भागात सातारा शहराच्या मध्यवर्ती आहे. त्या जागेत नगर परिषदेची सुसज्ज अशी मुख्य इमारत उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.

सुसज्ज पदाधिकारी दालने, कॉन्फरन्स हॉल, नगर परिषद सभागृह, विश्रांतीगृह, कर्मचारी अभ्यागतांसाठी उपहारगृह अभ्यासकांसाठी अभ्यागत कक्ष विविध सुविधा आहेत. तसेच सातारा नगर परिषद जवळ झालेले असतील तर त्यांनी समाविष्ट झालेल्या भागामध्ये विकासकामे करण्याकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली झालेल्या भागाच्या विकासासाठी सुमारे ७० कोटींचा निधी लवकरच प्रदान करण्यात येईल, तसेच प्रशासकीय इमारतीची गरज विचारात घेऊन नगरविकास विभागात प्रथम दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले. या भेटीप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक दत्ता बनकर, काका धुमाळ, विनीत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Funds should be provided for the development of Satara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.