शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भांबवलीच्या कुशीतील ‘फुलोत्सव’ फेडतोय डोळ्यांचे पारणे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:36 IST

सातारा : देशात सर्वात उंच असलेला भांबवलीचा धबधबा पावसाळा सुरू होताच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. हा जलप्रपात जसा प्रसिद्ध ...

सातारा : देशात सर्वात उंच असलेला भांबवलीचा धबधबा पावसाळा सुरू होताच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. हा जलप्रपात जसा प्रसिद्ध आहे, तसाच हिरव्यागार डोंगरांगांच्या कुशीत फुलणाऱ्या रानफुलांचा रंगोत्सवही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सध्या भांबवलीजवळ अशी अनेक रानफुले उमलली असून, हा फुलोत्सव सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.भारतातील सर्वात उंच असलेल्या धबधब्यांपैकी भांबवली-वजराईचा धबधबा सर्वात उंच असून, याची उंची सुमारे ५६० मीटर इतकी आहे. पावसाळ्यात हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये कोसळतो. कास पठरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतो. भांबवली परिसरात निरव शांतता असून, बारमाही गार वारा असतो. या ठिकाणाहून उरमोडी जलाशय, शिवसागर (कोयना) जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगडाचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते.भांबवलीच्या जंगलात अनेक वन्यजीवांचा अधिवास असून, फुलपाखरे, विविध प्रकारची औषधी झाडे येथे नेहमीच दृष्टिक्षेपात पडतात. निसर्गाचे वरदान लाभलेला भांबवलीचा परिरसर जंगली फुलांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. सध्या या परिसरात गुलाबी, राखाडी, लाल, हिरव्या, पिवळ्या, जांभळ्या व पांढºया रंगाची रानफुले मोठ्या प्रमाणात बहरली असून, हा फुलोत्सव स्थानिकांसह या परिसराला भेट देणाºया पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले भांबवलीकडे वळू लागली आहेत.भांबवली पठाराकडे दुर्लक्षभांबवली पुष्प पठार हे सातारा, जावळी व पाटण तालुक्यापर्यंत पसरले आहे. त्याचा विस्तार खूप मोठा असून, त्याची मोजणी झालेली नाही. या पठारावर दुर्मीळ फुले बहरतात; पण संशोधकांनी भांबवलीसारखे सर्वात मोठ्या पुष्प पठाराकडे लक्ष गेले नाही.