शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

शासकीय कार्यालयासमोरच पाण्याची गळती

By admin | Updated: January 14, 2015 00:35 IST

स्थानिक त्रस्त : अधिकारी वर्गानेही घेतली गांधारीची भूमिका

सातारा : येथील जिल्हा परिषद ते सदर बझार या परिसरात जागोजागी जलवाहिनीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे या परिसरातच विविध शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांची निवास्थाने आहेत तरी सुध्दा या गळतीकडे पाहून देखील अधिकारी वर्गांनी गांधारीची भूमिका घेतली आहे की काय असा पश्नच नागरिकांना पडला आहे.जिल्हा परिषदेच्या चौकातच दिवसभर पाणी वाहत असते हे पाणी जिल्हा परिषद पासून शासकीय विश्रांतीगृहापर्यंत पोहोचले असून गळती लागलेल्या वाहत्या पाण्यामुळे आता रस्ताही उखडला असून रस्त्यावर मोठी डबकी पडली आहेत. तर अनेक ठिकाणी दलदल माजली आहे. जिल्हा परिषद ते सदरबझार येथील समाज कल्याण कार्यालयापर्यंत ही गळती जागोजागी पाहायला मिळते. याविषयी तक्रारी करूनदेखील कोणतीच दखल घेत नाहीत. त्यामुळे आता तक्रारदारही या गळतीकडे दुर्लक्ष करीत आहे.दरम्यान, येथील शासकीय कार्यालय व निवास स्थानकाच्या मार्गावरच ही अवस्था आहे. तर दुसरीकडे सातारा विश्रामगृह याच मार्गावर आहे. त्यानुसार सातारा शहर व जिल्ह्याचे प्रशासनाच्या दारीच ही अवस्था असल्याने जिल्ह्याचे चित्र कसे असेल अशी कल्पना काहीजण करीत आहेत. शासकीय विश्रामधाममध्ये सतत आमदार, खासदार, मंत्री व वरिष्ठ अधिकारी येतात. एकीकडे शासनाने पाणी वाचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रबोधन करायचे, दुष्काळी भागासाठी पाणी देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून आराखडा तयार करायचा, दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरण्यासाठी आवाहन करायचे आणि पाच ठिकाणी पाणी गळती लागून हजारो लिटर पाणी वाचा जात असताना पाण्याच्या डबक्यातून वाहने चालवीत जगाला पाण्याची किंमत सांगणाऱ्या या नेतेमंडळी व अधिकाऱ्यांना या गळत्या कधी काढणार, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यापासून या रस्त्यावर विविध ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. जिल्हा परिषद चौक ते सदरबझार येथील तारळकर घरापर्यंत रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत पाण्यासाठी फिरावे लागते. शासनाने गळती काढली तर हजारो लोकांना याचा लाभ होईल.-गणेश भोसलेरस्ता उखडलाशासकीय विश्रामगृहात नेहमीच मंत्री, अधिकाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता नेहमीच चकाचक असतो; परंतु सध्या लागलेल्या जलवाहिनीच्या गळतीमुळे जागोजागी रस्ता उखडला आहे. तर अनेक ठिकाणी गळती लागलेले पाणी या उखडलेल्या रस्त्यात साचून डबकी झाली आहेत.