शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग शहरात वीजपुरवठा खंडित, धरणे आंदोलन छेडू : नानचे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:02 IST

दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला. त्यावर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी दिली.

ठळक मुद्देदोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा होतोय खंडित..अन्यथा धरणे आंदोलन छेडू : संतोष नानचे यांचा इशारा

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला. त्यावर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी दिली.दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाळ्याच्या तोंडावरच वीजप्रवाह वारंवार खंडित होत आहे. याकडे नानचे यांनी लक्ष वेधले. कुडाळ विद्युत कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांची त्यांनी याबाबत भेट घेतली. त्यावेळी चर्चेदरम्यान तालुक्यात चाललेल्या विजेच्या खेळखंडोबाबाबत त्यांनी दिली. यावेळी ग्रामस्थ सुनील म्हावळणकर, फोंडू हडीकर उपस्थित होते.तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने व्यापारीवर्गाचे नुकसान होत आहे. जंगलभागातून गेलेल्या विद्युत वाहिन्या रस्त्यालगत घालण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय दोडामार्ग तालुक्याचे ठिकाण असल्याने कोणत्याही परिस्थितीत शहराचा विद्युत पुरवठा खंडित होऊ देऊ नका. एखाद्या वेळेस वीज गेल्यास पर्यायी मार्ग म्हणून कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. ची वीज जोडून द्या, अशी मागणी केली.यावेळी कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी लॉकडाऊनमुळे पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यास उशीर झाल्याचे मान्य केले. यापुढे दोडामार्ग शहराचा वीज पुरवठा कायम सुरळीत ठेवण्याची काळजी घेतली जाईल. प्रसंगी महालक्ष्मीची वीज जोडून पर्यायी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले.पर्यायी उपाययोजना राबवू : रमेश लोकरेाुढील पंधरा दिवसांत दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वत: दोडामार्गमध्ये येऊ. त्यावेळेस रस्त्यालगत विद्युत वाहिनी टाकण्याबाबत उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांबाबत चर्चा करू व तशी उपाययोजना राबवू, असे कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांनी नानचे यांना सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग