शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी सायकलवर रुग्णांना मोफत सेवा

By admin | Updated: August 14, 2015 21:54 IST

वय वर्ष पासष्ठ : पदरमोड करत जोपासली सामाजिक बांधिलकी

प्रमोद सुकरे-कऱ्हाड--‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा,’ असे वैद्यकीय व्यवसायाचे ब्रीदवाक्य मानले जाते; परंतु अलीकडच्या काळात वैद्यकीय व्यवसायाबाबत जनमानसात समज-गैरसमज निर्माण होऊ लागले आहेत. या सगळ्या परिस्थितीत कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना कऱ्हाडातील एक व्यक्ती रुग्णसेवेसाठी झपाटल्यासारखे काम करत आहे. स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून जात, धर्म न पाहता गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या त्या अवलियाचे नाव पी. डी. निलाखे असे आहे.‘कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये, असं म्हणतात. तसेच दवाखान्याची पायरी कुठल्याही माणसाला चढायला लावू नये, हेही तितकेच खरे. त्यातच ती व्यक्ती गरीब कुटुंबातील असेल, तर त्याच्यावर उपचार करणे आणि त्याची काळजी घेणे अवघड होऊन बसते; परंतु समाजसेवेचे व्रत घेतलेल्या पी. डी. निलाखे यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून अशा ज्येष्ठ नागरिकांचा व गरीब, गरजू रुग्णांचा उपक्रम चालू ठेवला आहे. पी. डी. निलाखे अशा रुग्णांचा शोध घेतात. त्या व्यक्तींपर्यंत सायकलवरून पोहोचतात. त्याला स्वत: आयुर्वेदिक तेलाच्या साह्याने मालिश करतात. स्वत: घेऊन गेलेल्या साबणाने अंघोळ घालत नवीन टॉवेलने पुसतात आणि कोणताही मोबदला न घेता ते परततात.आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना आणि रुग्णांना वेळ देऊ शकत नाही. अशा वेळी निलाखे यांच्या कृतीतून समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचाच प्रयत्न होताना दिसून येत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे आज विविध स्तरांतून कौतुक होते खरे; पण यातून प्रत्येकांनी काहीतरी बोध घेतला. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली.रुग्णांची सेवा केली तर खऱ्या अर्थाने संस्काराची शिदोरी आपल्या गाठीशी आहे, असे म्हणता येईल. (प्रतिनिधी)सेवानिवृत्तीनंतर उरलेल्या आयुष्यातही आपण समाजाची सेवा करावी म्हणून मी हे काम करीत आहे. पहिल्यापासून सायकलवरून फिरण्याची सवय असल्यामुळे कऱ्हाड शहर व ग्रामीण भागातील गरजू रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मी सेवा करतो. सायकल चालविल्याने माझे आरोग्यही चांगले राहते.- पी. डी. निलाखेप्रांताधिकाऱ्यांकडूनही दखलपी. डी. निलाखे यांच्या कार्याची दखल घेत कऱ्हाडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी त्यांचा नुकताच त्यांचा सत्कारही केला. तसेच समाजसेवेच्या कामासाठी मदत म्हणून काही रक्कमही देऊ केली. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.६५ व्या वर्षीही सेवेचा उत्साहवीजवितरण मंडळ कं पनीत लाईनमन काम करीत असलेले निलाखे हे पाच वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर रुग्णसेवा करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. आजपर्यंत ७० हून अधिक रुग्णांची सेवा निलाखे यांनी केली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी देखील निलाखे यांच्या जवळ असलेला सेवेचा उत्साह तरुण पिढीलाही लाजवणारा आहे.